सतीश चव्हाणांची हॅट्रीक, की बोराळकर बाजी मारणार.. उद्या मतमोजणी

पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ६७.४४ टक्के मतदान परभणीत झाले. त्या खालोखाल उस्मानाबाद ६६.९७, जालना ६६.४८, लातूर ६६.१८, नांदेड ६४.११, औरंगाबाद ६३.१६, हिंगोली६५.५८ तर बीडमध्ये६२.८, टक्के मतदानाची नाेंद झाली.
Marathwada Graduate Elections counting news Aurangabad
Marathwada Graduate Elections counting news Aurangabad

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी विक्रमी ६४.५३ टक्के मतदान झाल्याने विजयी कोण होणार? यावर मोठी चर्चा रंगली आहे. दोन्ही उमेदवारांनी छातीठोकपणे विजयाचे दावे केल्याने पदवीधरांचा कौल नेमका कुणाला हे उद्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. पहिल्या पंसतीची मते घेऊन विजयी होण्याचे दावे करणारे महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आता निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांवर लागेल असेही बोलू लागले आहेत. त्यामुळे उद्या कुणाचा `निक्काल`, लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी व भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुड आॅफ नेशन भाजपच्या बाजूने असल्याचा दावा केला गेला, तसेच पदवीधरच्या निवडणूकीत तेच दिसेल असेही त्यांनी म्हटले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने तीन पक्षाच्या एकजुटीचा विजय होऊन सतीश चव्हाण हॅट्रीक साधतील, असा दावा केला. आता कुणाचा दावा खरा ठरतो आणि कुणाचा फोल हे उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

विक्रमी मतदानाने गणित बदलणार?

मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत यावेळी झालेले मतदान हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान असल्याचे बोलले जाते. मतदानाने ६४ टक्क्यांचा पल्ला गाठल्याने हे वाढीव मतदान कुणाच्या बाजुने जाते यावर महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.तब्बल २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.विशेष म्हणजे यात महिला मतदारांचे प्रमाण देखील ५२ टक्यांच्या आसपास होते आणि हे देखील आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे बोलले जाते. पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ६७.४४ टक्के मतदान परभणीत झाले. त्या खालोखाल उस्मानाबाद ६६.९७, जालना ६६.४८, लातूर ६६.१८, नांदेड ६४.११, औरंगाबाद ६३.१६, हिंगोली ६५.५८ तर बीडमध्ये ६२.८, टक्के मतदानाची नाेंद झाली.

पदवीधर मतदारसंघात यावेळी तब्बल ३५ उमेदवार मैदानात होते. भाजप आणि महाविकास आघाडी बरोबर, एमआयएम, वंचित, प्रहार, आप, समाजवादी, रिपब्लिकन सेना, मेस्टा यांच्यासह बंडखोर उमेदवारांमुळे चुरस अधिकच वाढली आहे. अन्य मतदारांनी किती आणि कुणाची मते घेतली यावर देखील निकाल पहिल्या पंसतीच्या मतांवर लागतो की मग दुसऱ्या पंसतीच्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com