शहराची बदनामी करणारा कोणत्याही पक्षाचा असो, त्याचं थोबाडं फोडा..

औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची शिवसेनेची मागणी खूप वर्षांपासूनची आहे. संभाजीनगरला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. जे मुस्लीम आपल्या मुलांची नावं देखील औरंगजेब ठेवत नाही, त्या औरंगजेबाचे नाव आपल्या शहराला कशाला पाहिजे. आणि म्हणून संभाजीनगर व्हायचे तेव्हा होईलच, पण विकासकामे करणारे नगरसेवकच महापालिकेत गेले पाहिजे याकडे देखील आपण लक्ष ठेवले पाहिजे, असे आवाहन दानवे यांनी केले.
mla ambadas danve speech news Aurangabad
mla ambadas danve speech news Aurangabad

औरंगाबाद ः विरोधक आम्हाला विचारतात शहराचा काय विकास केला? रस्त्यावर खड्डे आहेत, कचरा आहे. माझे त्यांना आव्हान आहे कुठल्या रस्त्यावर खड्डे आहेत दाखवा, एखादा रस्ता खराब असू शकतो. पण सरकट संपुर्ण शहरात कुठलाच विकास झाला नाही, अशी बदनामी काही लोकांनी सुरू केली आहे. जे लोक या शहराची बदनामी करतात, ते मग कोणत्याही पक्षाचे असो, त्याचं थोबाडं फोडा, असे आवाहन शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले. शिवसनेने केलेला विकास दाखवण्यासाठी एक बस करून तुम्हाला त्यातून फिरवू, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.

शहरातील ठाकरेनगर येथील चौकात उभारण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हातातील तलावर आणि शिवाजी महाराजांच्या जीरेटोपाच्या प्रतिकृतीचे लोकार्पण अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अंबादास दानवे यांनी सुपर संभाजीनगरची संकल्पना आणि शहारात झालेल्या विकासकामांची माहिती देतांनाच शहराची बदनामी करणारा कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला समजेल अशा भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला.

अंबादास दानवे म्हणाले, शहरात झालेले उड्डाणपूल, एसटीपी प्लांट, रोज गार्डन, बाॅटनिक गार्डन,छत्रपती शिवाजी ्महाराज वस्तु संग्रहालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, डाॅ. अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, कचरा प्रक्रिया प्रकल्प, होऊ घातलेली १६८० कोटीची पाणीपुरवठा योजना, सफारी पार्क, १५२ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे हा विकास नाही तर मग काय आहे. औद्याेगिक क्षेत्रात देखील मुंबई, पुण्यानंतर सर्वाधिक साडेसात हजार उद्योग हे आपल्या शहरात, जिल्ह्यात आहेत. त्याठिकाणी अडीच लाख कामगार काम करतात. हे सगंळ कुणी केलं तर शिवसेनेने केलं.

या भावनेतूनच सुपर संभाजीनगरची संकल्पना आम्ही मांडली, पण त्याला जातीयतेचा रंग दिला गेला. जे कुणी शहराची बदनामी करतात ते यापुढे महापालिकेत दिसणार नाही याची काळजी आता तुम्हाला घ्यायची आहे. शिवसेना विकासकामे तर करतेच पण लोकांच्या सुख-दुःखात देखील धावून जाते. संकट आले की पळून किंवा शेपूट घालून घरात बसत नाही, तर निधड्या छातीने समोर जाणारे हे शिवसैनिक असतात हे लक्षात ठेवा.

आता नारळ फोडण्याची वेळ आमची..

या भागात जी विकासकामे झाली आहेत मग ती रस्त्यांची असो की अन्य कुठली, ती आताच्या सरकारने केली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे ती होत आहेत. या भागातील रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन १२ डिसेंबर रोजीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यानंतर आता काही लोक पुन्हा भूमीपूजन करून नारळ फोडत आहेत. त्यांच्या गाडीतच नारळ असते पण आता नारळ फोडण्याची वेळ तुमची नाही तर आमची आहे, असा टोला दानवे यांनी भाजपचे आमदार अतुल सावे यांना लगावला.

औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची शिवसेनेची मागणी खूप वर्षांपासूनची आहे. संभाजीनगरला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. जे मुस्लीम आपल्या मुलांची नावं देखील औरंगजेब ठेवत नाही, त्या औरंगजेबाचे नाव आपल्या शहराला कशाला पाहिजे. आणि म्हणून संभाजीनगर व्हायचे तेव्हा होईलच, पण विकासकामे करणारे नगरसेवकच महापालिकेत गेले पाहिजे याकडे देखील आपण लक्ष ठेवले पाहिजे, असे आवाहन दानवे यांनी केले.

आधी आपण एकटे होते, पण आता आपल्या सोबत काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी देखील आली आहे. एक से भले दो नाही तर तीन आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरात आणखी झपाट्याने विकासकामे होतील, असा विश्वास देखील दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com