राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणेंनी केजचा गड मजबूत केला..

सुरुवातीला बिनविरोध निवडीतही राष्ट्रवादीने बाजी मारली होती. सोमवारी निकालातही केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केल्याचे समोर आले.
Ncp Victory in beed news
Ncp Victory in beed news

बीड : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे होमपिच असलेल्या केज तालुक्यात राष्ट्रवादीने चमकदार कामगिरी केली. विजयी उमेदवारांचा त्यांचे पवनसुत या निवासस्थानी जल्लोष झाला. यावेळी तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे, भुसारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक जाहीर झाली होती. यात सुरुवातीला १८ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने उर्वरित १११ ग्रामपंचायतींच्या ८४२ सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी मतदार होऊन सोमवारी मतमोजणी झाली. दरम्यान, सुरुवातीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे होमपिच असलेल्या केज तालुक्यातील बिनविरोध निवडी झालेल्या ग्रामपंचायतींच्या यादीतही राष्ट्रवादीच पुढे होती.

विडा गटातील येवता, तसेच नांदुरघाट गटातील वाघेबाभुळगाव ग्रामपंचायती सर्वात मोठ्या असून त्या ठिकाणी निवडणुकामध्ये सत्ता परिवर्तन करण्यात बजरंग  सोनवणे यांना यश आले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायत ताब्यात घेऊन तालुक्यात राष्ट्रवादीचा गजर पुन्हा घुमला आहे.

पाथरा, काशिदवाडी, मुंडेवाडी, सुकळी, भोपळा, रामेश्वरवाडी, बानेगाव, कोरडेवाडी, लाखा, बोबडेवाडी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाने  सत्ता मिळवून दिली. सुरुवातीला बिनविरोध निवडीतही राष्ट्रवादीने बाजी मारली होती. सोमवारी निकालातही केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केल्याचे समोर आले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com