वाढलेले मतदान बारा वर्षाच्या कामाची पावतीच, हॅट्रीक करणारच..

या आधी दोनवेळा मला त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. मी देखील त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून ते सोडवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सगळेच प्रश्न सुटले असा दावा मी करत नाही, पण बऱ्याच प्रमाणात मी यशस्वी ठरलो आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील मतदारांनी मला भरभरून मतदान केल्याचेच या वाढीव आकडेवारीवरून स्पष्ट होते.
Graduate Candidate satish Chavan reaction news
Graduate Candidate satish Chavan reaction news

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये रेकाॅर्डब्रेक मतदान झाले आहे. या वाढीव मतदानामुळे विरोधक बदलाचा दावा करत असले तरी त्यात तथ्य नाही. बारा वर्षात पदवीधर, शिक्षक व बेरोजगार तरुणांचे प्रश्न सभागृहात मांडून ते सोडवून घेतलेल्या माझ्या कामाची ही पावती आहेे. त्यामुळे मी हॅट्रीक करणारच असा दावा, महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी केला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात काल झालेल्या मतदानात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसला. २०१४ च्या निवडणुकीत जेमतेम ३८ टक्के मतदान झाले होते. आतापर्यंतच्या निवडणुकीत महिला मतदानाचे प्रमाण हे २० ते २५ टक्के एवढेच असायचे. यावेळी महिला मतदानाचा टक्का देखील ४० ते ४५ टक्यांवर गेला आहे. हे वाढीव मतदान सत्ताधारी तसेच विरोधकांना बुचकाळ्यात टाकणारे आहे.

हे वाढलेले मतदान बदलाची नांदी आहे,की मग दोन टर्म प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराला पुन्हा संधी याबद्दल उत्सूकता निर्माण झाली आहे. परंतुु हे वाढलेले मतदान आपलेच असा दावा चव्हाण आणि बोराळकर या दोघांनीही केला आहे. सतीश चव्हाण म्हणाले, मतदारांमध्ये असलेला उत्साह माझ्या हॅट्रीकची नांदी आहे असे मी समजतो. पदवीधर मतदारांनी या आधी दोनवेळा मला त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. मी देखील त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून ते सोडवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

सगळेच प्रश्न सुटले असा दावा मी करत नाही, पण बऱ्याच प्रमाणात मी यशस्वी ठरलो आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील मतदारांनी मला भरभरून मतदान केल्याचेच या वाढीव आकडेवारीवरून स्पष्ट होते. बारा वर्षात केलेल्या विकास कामाची पावतीच यातून मतदारांनी मला दिली आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी-शिवसेना-काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेवटपर्यंत बुथवर बसून होते.

महाविकास आघाडीची एकजूट जशी राज्याच्या सत्तेत दिसते, तीच सत्तांतराच्या पहिल्या निवडणूकीत देखील दिसून आली. मतदार नोंदणीसाठी जी मेहनत आम्ही गेल्या काही वर्षांपासून घेतली, त्याचे परिणाम कालच्या मतदानातून दिसल्याशिवाय राहणार नाही. प्रभावी प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणच्या मतदारांपर्यंत थेट संपर्क साधण्यात आम्हाला यश मिळाले. त्यातूनच मतदारांमध्ये देखील कमालीचा उत्साह पहायला मिळाला. त्यामुळे मी हॅट्रीक साधणारच, असा दावा सतीश चव्हाण यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com