भाजपच्या महिला बालकल्याण सभापतींनी गावची ग्रामपंचायत राखली, ११ पैकी ९ जागा जिंकल्या..

भाजपच्या जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी हिवरेबाजारच्या पोपटराव पवारांचा आदर्श घेत किनगांव आदर्श करण्याचा संकल्प हाती घेतला होता. या संकल्पपुर्तीसाठी त्यांनी गावांतील पाणी, रस्ते या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना किनगांवकरांनी पुन्हा एकदा सत्ता हाती देत पाठबळ दिले आहे.
Bjp Kingaon Grampanchyat Win news
Bjp Kingaon Grampanchyat Win news

औरंगाबाद : गेल्या पंधरा वर्षापासून ताब्यात असलेली फुलंब्री तालुक्यातील किनगांव ग्रामपंचायत पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांच्या ताब्यात आली आहे. गावात केलेली विकास कामे, नवीन चेहऱ्यांनी दिलेली संधी आणि लोकांचा विश्‍वास या जोरावर चव्हाण यांनी ग्रामंपचायतीवर पुन्हा  वर्चस्व मिळवले. त्यांच्या 'आदर्श ग्रामविकास पॅनलचे ११ पैकी ९ सदस्य विजयी झाले आहेत. 

भाजपच्या जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी हिवरेबाजारच्या पोपटराव पवारांचा आदर्श घेत किनगांव आदर्श करण्याचा संकल्प हाती घेतला होता. या संकल्पपुर्तीसाठी त्यांनी गावांतील पाणी, रस्ते या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना किनगांवकरांनी पुन्हा एकदा सत्ता हाती देत पाठबळ दिले आहे.

गेल्या पंधरा वर्षात किनगांवचा विकास साधत नव-नवीन उपक्रम अनुराधा चव्हाण यांनी गावांत राबवले. आदर्श ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा मतदारांचा कौल मागितला आणि गावकऱ्यांना त्यांना भरभरून यश दिले. त्यांच्या पॅनलचे  किशोर चव्हाण, विकास चव्हाण, अमोल सोनवणे, सुधाकर तावडे, तुकाराम साळवे, रुपाली चव्हाण, पुष्पा चव्हाण, मनिषा चव्हाण, शीतल चव्हाण हे नऊ सदस्य विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे दोनशे ते अडीचशेच्या मताधिक्यांनी त्यांनी हा विजय साकारला.

ग्रामपंचायत निवडणूक जाहिर झाल्यापासून ते निकाला पर्यंतचे नियोजन करत अनुराधा चव्हाण यांनी यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला, तो कमालीचा यशस्वी ठरला आहे. निवडणूकीतील वचननाम मतदाराच्या गाठी-भेटी, रस्ते, चांगली शाळा, ड्रेनेज लाईन, सुज्ज अभ्यासिका, जीम. ऑनलाईन कोचिंग क्लासेस, सैन्यभरतीच्या तयारीसाठी चारशे मीटरचा ट्रॅक.पथदिवे, सरकारी योजना सर्वापर्यंत पोहचविण्यासाठी विषेश नियोजन, व्यसनमुक्त गाव अशा अनेक संकल्पना त्यांनी प्रचारा दरम्यान मतदारांसमोर मांडल्या. गावकऱ्यांनी देखील त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना पुन्हा संधी दिली. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com