प्रचाराच्या आघाडीचे रुपांतर भाजप विजयात करणार.. - BJP will transform the campaign front into victory | Politics Marathi News - Sarkarnama

प्रचाराच्या आघाडीचे रुपांतर भाजप विजयात करणार..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणण्याच्या हेतून नेत्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निवडणूक प्रमुख माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यास मराठवाड्याती सर्व आमदार, खासदार यांनी बोराळकरांच्या प्रचारात शक्तीपणाला लावल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार उद्या संपणार आहे. भाजप महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत भाजपचे शिरीष बोराळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मिडिया, प्रत्यक्ष भेटीगाठी, मेळावे, सभांच्या माध्यमातून स्वतः उमेदवार आणि भाजपचे मराठवाडा तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी गेली दहा दिवस जोरदार प्रचार केला. या प्रचाराचे रुपांतर विजयात करण्याचा विश्वास देखील या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या (ता.२९) सायंकाळी थंडावणार आहेत. गेली बारा वर्ष राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणण्याच्या हेतून नेत्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निवडणूक प्रमुख माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यास मराठवाड्याती सर्व आमदार, खासदार यांनी बोराळकरांच्या प्रचारात शक्तीपणाला लावल्याचे चित्र आहे.

प्रामुख्याने जालना जिल्हाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे होती. त्यांनी देखील संपुर्ण जिल्हा तर पिंजून काढलाच या शिवाय मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातली मेळावे घेत त्यांनी पदवीधरांना आवाहन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रचाराची धुरा खासदार डाॅ. भागवत कराड, बीड, लातुर, परभणी जिल्ह्यांमध्ये पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी तर उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांनी समर्थपणे पेलली. माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री मतदारसंघासह जिल्ह्यातील सहकारी बँका, दुध महासंघ, साखर कारखाने येथील पदवीधर मतदारांच्या भेटीगाठी घेत बोराळकरांना निवडून देण्याचे आवाहन केले.

तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांवर देखील प्रचाराची जबादारी सोपवण्यात आली होती. खासदार कराड यांनी शहरातील डाॅक्टर, सर्व शिक्षण संस्था, हाँस्पिटलला भेटी देऊन पदवीधरांना मतदानाचे आवाहन केले. आमदार अतुल सावे यांच्याकडे पुर्व मतदार संघ तसेच औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मतदारासोबत संपर्क साधण्याची जबाबदारी होती. राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी सर्व शासकीय कार्यालय तसेच सुरक्षा यंत्रणा यांच्या भेटीगाठी घेतल्या.लोकसभा व विधानसभा निहाय प्रत्येक पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती.

शहरात शहर-जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर, पुर्वचे प्रमुख प्रमोद राठोड, मध्येचे समीर राजुरकर, पक्ष्चिमचे दिलीप थोरात, फुलंब्रीचे प्रमुख बापू घडामोडे यांनी प्रचार यंत्रणेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. महिला आघाडीने देखील घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना बोराळकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.

नेते ठाण मांडून..

विशेष बाब म्हणजे या निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेते  बोराळकर यांच्या प्रचारासाठी आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार,  आमदार नितेश  राणे, श्रीकांत भारतीया, विधानसभा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, हे भाजप नेते मराठवाडा पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी मराठवाड्यात ठाण मांडून होते.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख