आमदार कैलास पाटलांच्या आवाहनानंतर मतदारसंघात ८ ग्रामपंचायती बिनविरोध..

बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतीला आता ठरल्याप्रमाणे विविध योजनेच्या माध्यमातुन निधी देणार असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले आहे. ज्या गावांनी कृतीशील पाऊल टाकत एक चांगला आदर्श घालुन दिला आहे, त्यांना निधीसाठी कधीही कमतरता भासु देणार नसल्याची ग्वाही आमदार पाटील यानी दिली आहे.
mla kailas ghadge patil  news
mla kailas ghadge patil news

उस्मानाबाद : उस्मानाबाद- कळंब मतदारसंघातील ८१ पैकी आठ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी बिनविरोध येणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली होती. आता लवकरच या ग्रामपंचायतींना निधीचे पत्र दिले जाणार आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हापासूनच त्या त्या मतदारसंघातील आमदरांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यासाठी आमदार निधीमधून २१ ते २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. काही ठिकाणी या घोषणेला, आवाहनाला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, तर काही ठिकाणी ग्रामस्थ निवडणूकीवर ठाम राहिले.

मराठवाड्याचा विचार केला तर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, मेघाना बोर्डीकर, नारायण कुचे, शिवसेनेचे उदयसिंह राजपूत, कैलास घाडगे पाटील आदींनी देखील बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी मतदारसंघातील गावकऱ्यांना आवाहन केले होते. पैकी कुचे, बोर्डीकर, घाडगे पाटील यांच्या मतदारसंघात काही प्रमाणात बिनविरोधच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. जिंतूर-सेलू मतदारसंघात सर्वाधिक २५ ग्रामंपचायती बिनविरोध झाल्याचे मेघना बोर्डीकर यांनी जाहीर केले आहे. तर नारायण कुचे यांच्या मतदारसंघात देखील ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील पोहनेर आणि कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा, वाकडी,आडसूळवाडी,लासरा,दुधाळवाडी,हळदगाव, सौंदणा(ढोकी)आदी गावाच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.यानिमित्ताने सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार कैलास पाटील यानी अभिनंदन केले आहे. गावाच्या एकोप्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे त्यानी आभार मानले आहेत.

गावाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन वाद बाजुला सारुन एका नव्या पर्वाची सूरुवात करण्याचे अवाहन कैलास पाटील यांनी मतदारसंघातील गावाना केले होते. त्याला मतदारसंघातील आठ गावांनी प्रतिसाद दिला असुन त्यामुळे गावाना आर्थिक फायदा होणार आहे. अनेक गावामध्ये काही वार्ड बिनविरोध निघाले असले तरी संपुर्ण ग्रामपंचायत मात्र निकाली निघु शकली नाही.

आमदार कैलास पाटील हे ग्रामपंचायतीच्या राजकारणातुन पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यामुळे गावातील राजकारणाचा त्यांना चांगला अनुभव आहे. गावातील ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी होत असलेली कुरघोडी किती टोकाची असते. त्याचा थेट नातेसंबधावर,मैत्रीपुर्ण संबधावर कसा परिणाम होतो, याची त्यांना जाणीव होती.त्यामुळे वाद,तंटे व प्रशासनावरील ताण याचा विचार करुन गावामध्ये निवडणुका न होता,आपसामध्ये चर्चा करुन निवडणुका बिनविरोध करण्यासाठी त्यांनी आवाहन केले होते.

बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतीला आता ठरल्याप्रमाणे विविध योजनेच्या माध्यमातुन निधी देणार असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले आहे. ज्या गावांनी कृतीशील पाऊल टाकत एक चांगला आदर्श घालुन दिला आहे, त्यांना निधीसाठी कधीही कमतरता भासु देणार नसल्याची ग्वाही आमदार पाटील यानी दिली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com