कर्तबगार IPS अधिकारी सदानंद दाते यांच्याकडे मीरा-भाईंदरची जबाबदारी - IPS officer Sadanand Date to 'sideline', May get Responsibility of SRP | Politics Marathi News - Sarkarnama

कर्तबगार IPS अधिकारी सदानंद दाते यांच्याकडे मीरा-भाईंदरची जबाबदारी

प्रशांत कोतकर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

देवेन भारती यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली करण्यात आली आहे. 

पुणे : राज्यातील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष अभियान) यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर बदली झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांचे राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. अमितेश कुमार (सहआयुक्त राज्य गुप्तवार्ता) यांची नागपूरचे पोलिस आयुक्त बदली झाली आहे. नागपूरचे आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक वाहतूक या पदावर बदली झाली आहे. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक जयजितसिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. मुंबईचे व्ही. के. चौबे यांचीपण अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत) याच पदावर बढली दाखविण्यात आले आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) येथे नियुक्ती झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिपिनकुमारसिंह यांची नवी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची मीरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर (वाहतूक), देवेन भारती (दहशतवादी विरोधी पथ) यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख