तुम्ही फक्त नावे कळवा; अख्खी औद्योगिक गुंडगिरी मोडून काढतो : एसपींचा उद्योजकांना दिलासा

चार प्रमुख औद्योगिक गुंड येरवड्यात पाठविले आहेत, आता उर्वरितांचा नंबर आहे.
SP Dr. Abhinav Deshmukh
SP Dr. Abhinav DeshmukhSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : पारदर्शक कंत्राट वाटप पद्धती, कंत्राट देताना पोलिस व्हेरीफिकेशन आणि कंत्राटे मिळविण्यासाठी धमक्या देणाऱ्यांची तक्रार आमच्याकडे करा, एवढीच त्रिसूत्री तुम्ही वापरा. पुणे-नगर रस्त्यावरील अख्खी औद्योगिक गुंडगिरी मोडून काढतो. गेल्या काही महिन्यांत चार प्रमुख औद्योगिक गुंड येरवड्यात पाठविले आहेत, आता उर्वरितांचा नंबर आहे. त्यामुळे तुम्ही त्रिसूत्री वापरून नावे कळवा, त्यांचा बंदोबस्त आम्ही करू, असे सांगून पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ४०० कंपन्यांची संघटना असलेल्या डीसीसीआयच्या बैठकीत सर्व कंपन्यांना कोविडनंतरच्या काळात उद्योग वाढविण्याच्या प्रेरणेबरोबरच सुरक्षिततेबाबत आश्वासित केले. ( You just give the names; Whole industrial Crime will be curtin : SP Dr. Abhinav Deshmukh)

पुणे-नगर महामार्गावरील एकुण ४०० कंपन्यांची संघटना असलेल्या डीसीसीआय (डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅंड अ‍ॅग्रीकल्चर पुणे) यांच्या पुढाकाराने सणसवाडी (ता. शिरूर) येथील अर्सेलर मित्तल स्टील कंपनीमध्ये डॉ. अभिनव देशमुख व प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक पार पडली. कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्र उप्तादन वाढीकडे झेपावत आहे. त्याचवेळी औद्योगिक शांतता कायम राहावी, यासाठी या बैठकीत काही प्रमुख कंपन्यांनी आपल्याला होत असलेल्या काही स्थानिक, राजकीय, सामाजिक, महिला व परप्रांतीय गुंड प्रवृत्तींबद्दल माहिती दिली. त्या बैठकीत औद्योगिक क्षेत्राला सतावणाऱ्यांबद्दल चर्चा होऊन गुन्हेगारी त्रास कायमचा संपविण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी मते मांडली.

SP Dr. Abhinav Deshmukh
वाबळेवाडीच्या संतप्त रणरगिणींची झेडपीवर धडक : शाळेबाबत निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

सर्वाधिक गुन्हेगारी होत असलेल्या कंत्राट मिळविण्याच्या प्रक्रियेबद्दल शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी आदर्श कंत्राट पद्धतीबाबत सांगितले. त्यानुसार कंत्राट प्रक्रियेत ‘डीसीसीआयए’नेही लक्ष घालून गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना सामावून घेण्याची सूचना केली. उपविभागिय पोलिस अधिकारी राहुल धस यांनीही अनेक उपाय योजना सूचविल्या.

दरम्यान, याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रत्येक कंपनीने स्वत:च गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक कंत्राटदार तसेच पोलिसांकडून घेणे, कंत्राट देताना ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीचा वापर करावा. त्यानंतरही कोणी त्रास दिल्यास त्याची फक्त तक्रार आमच्याकडे द्यावी, ही त्रिसूत्री वापरा. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी संपविण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवा, असा विश्वास त्यांनी यावेळी उद्योजकांना दिला.

SP Dr. Abhinav Deshmukh
जिल्हा परिषदेतील पराभवानंतर पालघर कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील

कार्यक्रमाला डीसीसीआयचे अध्यक्ष रथीन सिन्हा, माजी अध्यक्ष प्रकाश धोका, एचआर कमिटीचे अध्यक्ष मुकुंद जहागिरदार, उपाध्यक्ष जगदीश मुळे व व्यवस्थापिका दर्शना अहिरेकर आदींसह जिल्हा वाहतूक निरीक्षक अविनाश शिळीमकर, विशेष शाखेचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील, रांजणगाव व शिरूरचे पोलिस निरीक्षक अनुक्रमे बळवंत मांडगे, सुरेश राऊत आदींसह प्रमुख पोलिस अधिकारी उपस्थित होते.

चौघे येरवड्यात, काहीजण रांगेत : डॉ. देशमुख

कोरेगाव भीमा, सणसवाडी, कोंढापुरी ते रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रावर आपण स्वत: नजर ठेवून आहोत. गेल्या तीन महिन्यांत चौघांवर मोकासारख्या मोठ्या कारवाया करुन त्यांना येरवडा कारागृहात पाठविले आहे. आणखीही काही जण त्याच मार्गावर आहेत. फक्त तुम्ही तक्रारी करा, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

पुढच्या बैठकीवेळी तक्रारींवर कारवाई झालेली दिसेल

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपुढे मोठमोठ्या गप्पा होतात. मात्र, कारवाई आणि या बैठकांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबद्दल उदासिनता राहते. याच पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांनी बैठकीच्या शेवटी सांगितले की, पुढील बैठक मी महिनाभरात घेणार आहे. मात्र, त्या बैठकीत यावेळचे मुद्दे येणार नाहीत. उलट आज तुम्ही केलेल्या तक्रारी, सूचना यावर कार्यवाही झाली, त्याबद्दल आम्हीच तुम्हाला सांगू. तुम्ही एवढेच करा, कंपनीची उत्पादकता वाढवा, रोजगार वाढवा. कारण, आपण उद्योग क्षेत्राला व्यापक अर्थानेच पाहायला हवे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com