Assembly Session : भाजप नेत्यांच्याच नऊ साखर कारखान्याला मदत का? फडणवीस म्हणाले, ‘आम्ही अमित शहांकडे...’

राज्यातील इतर कारखान्यांनी ‘एनसीडीसी’कडे अर्ज करावा. त्याबाबत आपण पाठपुरावा करू आणि एनसीडीसीकडून जे येईल, त्यासंदर्भात मदत करण्याची भूमिका राज्य सरकार घेईल.
Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : मागील महाविकास आघाडी सरकारने तीन सहकारी साखर कारखान्यांना मदत केली होती. त्यावेळी या नऊ कारखान्यांनी सरकारकडे मदत मागितली होती. पण, या कारखान्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे आम्ही हे कारखाने घेऊन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे गेलो, त्यांनी ‘एनसीडीसी’ला निर्देश दिले आणि त्यामुळे या कारखान्यांना मदतीची भूमिका सरकारने घेतली, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. (Why help nine sugar factories of BJP leaders? Fadnavis gave the answer)

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील आठवड्यात सरकारकडून मदत करण्यात येणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्यांची यादी विधानसभेत वाचून दाखवली होती. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Solapur News : सोलापुरातील बड्या नेत्याच्या मुलाने हिंदु गर्जना मोर्चात तलवार नव्हे; लाकडी दांडा फिरवला; पोलिसांचा तपासात दावा

फडणवीस म्हणाले की, मागील सरकारने तीन सहकारी साखर कारखान्यांना मदत केली होती. त्यावेळी या नऊ कारखान्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली होती. पण, या कारखान्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे आम्ही हे कारखाने घेऊन ‘एनसीडीसी’कडे गेलो. राज्य सरकार मदत करत नाही, त्यामुळे तुम्ही मदत करा, अशी आमची मागणी होती.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Kul Vs Thorat : राहुल कुलांनी कुठलाच शब्द पाळला नाही...त्यांची चौकशी झाली पाहिजे : रमेश थोरातांनी संधी साधली

अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे एक बैठक घेतली. त्या बैठकीत शहांनी या कारखान्यांना मदत करण्याबाबत ‘एनसीडीसी’ला निर्देश दिले होते. ‘एनसीडीसी’कडून हे नऊ कारखाने मंजूर होऊन आले आहेत, त्यामुळे या नऊ कारखान्यांचे नाव येत आहे. त्या वेळी राज्य सरकारने मदत केली नाही; म्हणून केंद्र सरकारकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय समिती नेमणार; संपाचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन

आमच्या पक्षाशी संबंधित अजून १५ कारखाने आहेत, ते म्हणतात की आमचं नाव नाही आलं. त्यांनाही मी समजावून सांगतो आहे की, आम्ही नावं पाठवलीच नव्हती. ज्यांनी अर्ज केला आणि एनसीडीसीकडून ज्यांचे अर्ज आले आहेत. त्यांना आम्ही कॅबिनेटची मान्यता देतो आहोत. तुम्हाला डावलण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. राज्यातील इतर कारखान्यांनी ‘एनसीडीसी’कडे अर्ज करावा. त्याबाबत आपण पाठपुरावा करू आणि एनसीडीसीकडून जे येईल, त्यासंदर्भात मदत करण्याची भूमिका राज्य सरकार घेईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Solapur News: सोलापुरातील राष्ट्रवादी नगरसेवकपुत्राला स्टंटबाजी पडली महागात; हातात पिस्तुल घेऊन बुलेटवर स्टंट; गुन्हा दाखल

कोणत्या भाजप नेत्यांच्या कोणत्या कारखान्यांना मदत मिळणार?

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील : गणेश सहकारी साखर कारखाना, पद्यश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखाना

आमदार अभिमान्यू पवार : शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे : रामेश्वर सहकारी साखर कारखाना

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील : कर्मवारी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील : शंकर सहकारी साखर कारखाना,

माजी मंत्री पंंकजा मुंडे : वैद्यनाथ साखर कारखाना

खासदार धनंजय महाडिक : भीमा सहकारी साखर कारखाना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com