Sakal Saam Survey : 2024 ला कोणता पक्ष निवडून यावा असे वाटते? 'सकाळ'च्या महासर्वेक्षणामध्ये नागरिक म्हणतात...

Narendra Modi Government Nine years Sakal survey : भाजप मोठा पक्ष पण काँग्रेसलाही लोकांची पसंती...
Sakal-Saam Mahasurvekshan
Sakal-Saam MahasurvekshanSarkarnama

Sakal-Saam Mahasurvekshan : केंद्रातील भाजपच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. तसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सरकारबद्दल लोकांना काय वाटते, या संदर्भात 'सकाळ' माध्यम समूहाने एक महासर्वेक्षण केले आहे.

'सकाळ आणि साम महासर्वेक्षण 2023' मध्ये राज्यातील नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. सकाळच्या राज्यभरातील दोन हजार बातमीदारांनी या महासर्वेक्षणासाठी काम केले. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ, 48 लोकसभा मतदारसंघातून समाजाच्या सर्व स्तरातून 49 हजार 231 जणांचे मत विचारात घेण्यात आले आहे.

Sakal-Saam Mahasurvekshan
Sakal-Saam Survekshan: नऊ वर्षानंतरही पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम!

2024 ला कोणता पक्ष निवडून यावा असे वाटते? यामध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) निवडणून यावा, असे 33.8 टक्के लोकांना वाटते. तर काँग्रेसलाही लोकांनी मोठी पसंती दर्शवली आहे. काँग्रेस (Congress) निवडून यावी असे 19.9 टक्के लोकांना वाटते. तर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 15. 3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट ) 5. 5 टक्के लोकांनी पुन्हा निवडून यावे, असे लोकांनी म्हटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 12. 5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

या महासर्वेक्षणामध्ये भाजप मोठा पक्ष ठरत आहे. मात्र, शिवसेना (Shivsena) शिंदे गटाला अत्यंत कमी लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर शिवसेना ठाकरे गटही तिसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला मागे टाकले आहे. मात्र, महाविकास आघाडी म्हणून ही आकडेवारी एकत्र केली तर भाजपसाठी ही धोक्याची धंटा असू शकते.

Sakal-Saam Mahasurvekshan
Sakal-Saam Maha Survey : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'सकाळ-साम'च्या सर्व्हेक्षणातील 42 टक्के लोकांची भावना

मात्र, आज तरी या महासर्वेक्षणामध्ये भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरताना दिसतो आहे. त्यांना 33.8 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. मात्र, त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाला फारसे यश मिळताना दिसत नाही. शिवसेनेत पडलेली फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षामुळे शिंदे गट बॅकफूटवर दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com