Ajit Pawar On Koshyari : राज्यपाल कोश्यारींवर कारवाई कधी होणार? ; अजितदादांनी थेट तारीखच सांगितली....

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही म्हणतात की अभी बस हो गया.... बस हो गाया... मुझे जाना है.... जाना है.
 Ajit Pawar-Bhagat Singh Koshyari
Ajit Pawar-Bhagat Singh KoshyariSarkarnama

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि विराेधी पक्षांकडून कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विविध सामाजिक संघटनाही राज्यपालांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपालांवरील कारवाईबाबत थेट तारीख सांगून टाकली आहे, त्यामुळे कोश्यारी हे पदमुक्त होणार हे निश्चित झाल्याचे मानले जात आहे. (When will action be taken against Governor Bhagat singh Koshyari : Ajit Dada directly told the date....)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पाच डिसेंबरनंतर कारवाई होणार असल्याचे सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पाच डिसेंबर रोजी आहे. गुजरातच्या निवडणुकीनंतर राज्यपालांवर कारवाई होणार, अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, गुजरात विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पाच डिसेंबर रोजी आहे. कदाचित पाच डिसेंबर रोजीचं मतदान झाल्यावर त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

 Ajit Pawar-Bhagat Singh Koshyari
Captain Amarinder Singh : भाजपचा मोठा निर्णय : कॅप्टन अमरिंदर सिंगांवर सोपवली मोठी जबाबदारी

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल कोश्यारी यांनाही आपल्या महाराष्ट्रात राहायचे नाही. त्यांनाही परत जायचं आहे. ते म्हणतात की अभी बस हो गया.... बस हो गाया... मुझे जाना है.... जाना है, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘तो जाने दो...’ अशी भूमिका मांडली.

 Ajit Pawar-Bhagat Singh Koshyari
Solapur Lok Sabha : लोकसभेसाठी कपिल पाटील सोलापूर भाजपचे नवे ‘कॅप्टन’ : उमेदवार निवडीपासून ही आहेत तगडी आव्हाने

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. तसेच कारवाई न झाल्यास कडक पावले उचलण्याचा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी करण्यासाठी सर्वच बाजूने भाजपवर दबाव वाढत आहे. त्यामुळे भाजप श्रेष्ठी राष्ट्रपतीच्या माध्यमातून काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com