जेव्हा राज ठाकरे यांना मध्यरात्री २.४५ मिनीटांनी अटक करण्यात आली होती...

Raj Thackeray | MNS : राज ठाकरेंना पुन्हा अटक होणार?
जेव्हा राज ठाकरे यांना मध्यरात्री २.४५ मिनीटांनी अटक करण्यात आली होती...
Raj Thackeray | MNSSarkarnama

मुंबई : औरंगाबाद येथील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे पालन न करण्यात आल्याने मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आयोजकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. एफआयआरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख प्रमुख आरोपी म्हणून केला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात आहे. कारण यापूर्वी राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिकांनी अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता.

काय होते नेमके प्रकरण?

सुरुवातीच्या काळात मनसेने नवीन पक्षाला उभारी देण्यासाठी अनेक आंदोलन केली. पण त्या काळात राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील गाजलेले आणि पेटलेले सगळ्यात मोठे आंदोलन म्हणजे रेल्वे भरतीत प्ररप्रांतियांना विरोध. २००८ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे भरतीसाठी मुंबईत परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी त्यावेळी देशभरातून अनेक जण मुंबईत दाखल झाले होते. यात प्रामुख्याने उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्याचा दावा मनसेने केला होता. त्यावेळी रेल्वेमंत्री होते लालू प्रसाद यादव.

Raj Thackeray | MNS
हे कोल्हापूर आहे! मुस्लिम बांधवांनी शिवजयंती सोहळ्यात सोडला अखेरचा रोजा

याच परिक्षांमध्ये मराठी मुलांना डावललं जात असल्याचा आरोप करत राज्यात मराठी मुलांनात प्राधान्य मिळायला हवे अशी मागणी मनसेने केली होती. अशातच काही मराठी तरुणांचे फॉर्म नाकारले गेल्याची आणि हॉल तिकीट न मिळाल्याची घटना समोर आली. वाद चिघळत गेला आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर तुटून पडले. जवळपास १३ केंद्रावरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी घुसून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.

Raj Thackeray | MNS
कोणत्याही आदेशाची वाट बघू नका; मुख्यमंत्र्यांची कारवाईसाठी पोलिसांना पूर्ण मोकळीक

ही घटना वाऱ्यासारखी राज्यात आणि देशात पसरली. देशात राज ठाकरे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. अगदी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेत देखील या गोष्टीवर चर्चा झाली. सगळीकडून एकच मागणी पुढे येत होती, ती म्हणजे राज ठाकरेंना अटक करा. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी काहीशी सावध भूमिका घेतली होती. मात्र अखेरील न्यायालयाने आदेश दिला, वॉरंट निघाले आणि २२ ऑक्टोबर २००८ रोजी राज ठाकरे यांना मध्यरात्री २ वाजून ४५ मिनीटांनी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहातून अटक करण्यात आली.

राज ठाकरे यांना त्यानंतर रातोरात मुंबईला आणण्यात आले. पण राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन सुरु केली. काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. बीड, सांगली अशा ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. खाजगी व्यापाऱ्यांच्या दुकानाची मोडतोड करण्यात आली, एसटी बसची तोडफोड करण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. भरीस भर या सर्व हिंसक आंदोलनाला राज ठाकरे यांना जबाबदार धरण्यात आले आणि बीड, शिराळा याठिकाणी राज ठाकरे यांच्याविरोधत गुन्हे दाखल झाले. यातील अनेक गुन्ह्यांची आजही सुनावणी सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.