Jayant Patil News : उस्मानाबादमध्ये बोलले की त्याचा मोठा स्फोट होतो, येथे फार बोलायचे नसते : जयंत पाटील असे का म्हणाले?

मोदींमुळे भ्रष्टाचार कमी झाला असेल तर अलिकडचे काही दाखले दिले तर उत्तर काय आहे, हे तुम्हाला माहितीच आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

उस्मानाबाद : ‘उस्मानाबादमध्ये (Osmanabad) बोलले की त्याचा फार मोठा स्फोट होतो, त्यामुळे उस्मानाबादमध्ये फार बोलायचे नसते,’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उस्मानाबादमध्ये बोलताना केले. (When it is spoken in Osmanabad, there is a big explosion : Jayant Patil)

माजी मंत्री जयंत पाटील हे आज (ता. ३१ जानेवारी) उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे काहीसे गंमतीशीर विधान केले आहे. मात्र, जयंत पाटील यांनी असे विधान का केले, याची चर्चा उस्मानाबादमध्ये रंगली आहे.

Jayant Patil
Legislative Council Elections : जयंत पाटलांचे मोठे विधान : ‘पदवीधर-शिक्षक’च्या निवडणुकीत पैशाचा वापर

संसदेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला, असे मुर्मू यांनी म्हटले होते. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील बोलत होते. पाटील म्हणाले की, मोदींमुळे भ्रष्टाचार कमी झाला असेल तर अलिकडचे काही दाखले दिले तर उत्तर काय आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यावर पत्रकरांनी ‘कुठले दाखले’ असे विचारताच ‘आता नको द्यायला. उस्मानाबादमध्ये बोलले की त्याचा फार मोठा स्फोट होतो, त्यामुळे उस्मानाबादमध्ये फार बोलायचे नसते,’ असे मिश्किल विधान जयंतरावांनी केले.

Jayant Patil
Sangola News : गणपतराव देशमुखांच्या नातवाने पुन्हा वर्चस्व राखले : शहाजीबापू-दीपक साळुंखेंना तीन जागा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच उपस्थित होते. शिवसेना आणि काँग्रेसचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत, हे मला माहिती नाही. संसदेच्या अधिवेशनाच्या अगोदर मुख्यमंत्री अशा बैठका बोलवतात. त्यात महाराष्ट्रातील प्रश्न कोणत्या सरकारने कुठपर्यंत नेले आहेत. तसेच, खासदारांनी त्याला कशी साथ द्यायची, कसे प्रयत्न करायचे, याबाबतची चर्चा या बैठकीत होत असते. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत, याबाबत मी अनभिज्ञ आहे. त्यांच्या गैरहजेरीबाबत मी बोलणं योग्य नाही, असे सांगून खासदारांच्या गैरहजेरी बाबत बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com