दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे `ईडी`ला धुणार की भाजपला?

शिवसेनेचा (Shivsena) गेली अनेक वर्षे शिवाजी पार्क मैदानात होणारा हा मेळावा कोरोनामुळे मागच्या दोन वर्षापासून बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे.
Uddhav Thackeray dusshera melava
Uddhav Thackeray dusshera melavaSarkarnama

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) म्हणजे राज्यभरातील तमाम शिवसैनिकांसाठी उर्जेचा स्त्रोत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeary) यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा आज त्यांच्या पाश्चात देखील सुरु आहे. केवळ फरक म्हणजे मागचे अनेक वर्षे शिवाजी पार्कच्या मैदानात होणारा हा मेळावा कोरोनामुळे दोन वर्षापासून बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे. यंदा देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeary) यांच्या उपस्थितीमध्ये षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा होणार आहे.

Uddhav Thackeray dusshera melava
शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पण...

दसरा मेळामात्र यंदाच्या या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कोणाकोणावर धडाडणार हे बघणे महत्वाचे आहे. यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असू शकतो तो म्हणजे लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) हिंसाचाराचा. काही दिवसांपासून उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी इथल्या हिंसाचारावरुन विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. यात नुकतेच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आषिश मिश्राला अटक करण्यात आले आहे. मात्र या घटनेवरुन केंद्र सरकारने अद्याप मौन बाळगले आहे. याच घटनेचा निषेध म्हणून नुकताच 'महाराष्ट्र बंद' देखील पाळण्यात आला होता. त्यामुळेच या घटनेवरुन उद्धव ठाकरे केंद्र सरकारवर नेमकी काय टीका करतात हे बघणे महत्वाचे असणार आहे. राज्यात काही दिवसांपुर्वी झालेली अतिवृष्टी, आलेला महापूर आणि यात शेतकऱ्यांना सरकारने जाहिर केलेली मदत या मुद्द्यावर ठाकरे बोलू शकतात. तसेच राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोलू शकतात ते म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातल्या विविध नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचे सत्र सुरु आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडी आणि नोटीस यांचा ससेमिरा लागला आहे. नुकतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

Uddhav Thackeray dusshera melava
दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार?

उद्धव ठाकरे 12 आमदारांच्या नियुक्तीवर देखील बोलू शकतात. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूर केलेली नाहीत. सोबतच रोजच्या विविध मुद्द्यांवर देखील राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसलेले दिसून येते. त्यामुळे उद्धव ठाकरे राज्यपालांच्या या भुमिकेवर देखील टीका करु शकतात.

राज्याने मागच्या काही काळात कोरोनावर यशस्वीरित्या मिळवलेल्या नियंत्रणावर पण उद्धव ठाकरे बोलू शकतात. राज्यात झालेले लसीकरण, तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने उभारलेली व्यवस्था यावर देखील ते बोलू शकतात.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत शिवसैनिकांसाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा असणार आहे. आगामी काळात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा महत्वाच्या महापालिकांच्या निवडणूकांसह जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय कानमंत्र देतात? स्वबळाची घोषणा करतात का? या गोष्टी बघणे महत्वाचे असणार आहे.

गतवर्षीच्या मेळाव्याआधी सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरुन महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेवर चिखलफेक करण्यात आली होती. त्यावरुन अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांना ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले होते. सोबत बेडूक म्हणत नारायण राणेंच्यावर टीका केली होती. त्यानंतर मागच्या आठवड्यात देखील उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी राणेंवर टीका केली होती. त्यामुळे आता सुद्धा ठाकरेंच्या निशाण्यावर नारायण राणे असणार का? हे मेळाव्यातच कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com