Satyajeet Tambe News : नाशिकसाठी 'ती' बैठक ठरली महत्त्वाची; तांबेंच्या उमेदवारी संदर्भात पडद्यामागे काय घडले?

Satyajeet Tambe Latest News : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
Satyajit Tambe News
Satyajit Tambe NewsSarkarnama

Satyajeet Tambe Latest News : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत असे काय घडले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

भाजप आणि काँग्रेसने राज्यातील सगळीकडचे उमेदवार जाहीर केले तरी नाशिकचे ठरत नव्हते. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे काहीच ठरत नव्हते. बाळासाहेब थोरात गंभीर दुखापतीने ग्रस्त असताना नाशिक विधान परिषद निवडणुकीत तांबे कुटुंबीयांनी थोरात आणि काँग्रेसची कोंडी केली. ७ डिसेंबरला सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा होता. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा संकेत दिले होते. इतक्या चांगल्या तरुण नेत्याला संधी द्या, नाहीतर आमचे लक्ष आहे, असे फडणवीस म्हणाले होते.

Satyajit Tambe News
Satyajeet Tambe Latest News : सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेस उमेदवारी देणार हे स्पष्ट असताना सत्यजित तांबे भाजप (BJP) संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी तांबे कुटुंबीयांनी खेळी केली. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे याना उमेदवारी जाहीर केली असताना त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि भाजपकडून पाठिंबा मागितला. भाजप कडून अधिकृत उमेदवारी नाही. नाशिक विधान परिषद बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या आधी पडद्यामागेही अनेक घडामोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती, अशी माहिती मिळत आहे. तसचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर तांबे यांचे चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सत्यजीत तांबे यांची चार दिवसांपूर्वीच भेट झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्याच भेटीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जाते.

Satyajit Tambe News
Graduate Constituency Election : पक्षाने सांगितलं तर सत्यजीत तांबेंना पाठिंबा देऊ : विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरायचा आणि त्यांना भाजपने पाठिंबा द्यायचा, अशी खेळी ठरली होती, अशीही माहिती मिळत आहे. दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितला तर आम्ही देणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले. भाजपने कोणालाच अधिकृत उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे हे सगळे आधीच ठरले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com