Radhakrishna Vikhe Patil News : आमच्याच तहसीलदारांची आम्हाला लाज वाटते : महसूलमंत्री विखे पाटलांनी व्यक्त केली खंत

काहीजण वाळूच्या ठेकेदारांकडून हप्ते घेत आहेत. त्यामुळे आमच्याच लोकांची आम्हाला लाज वाटते.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama

मुंबई : ‘आमच्याच तहसीलदारांची आम्हाला लाज वाटते. अधिकारी आणि वाळूचे ठेकेदार हे शासकीय वाळू डेपोला अडथळे निर्माण करत आहेत. पण, जे आडवे येतील, त्यांना सरळ करण्याचे काम करण्यात येईल,’ असा खणखणीत इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. (We are ashamed of our own Tehsildars: Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil)

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, वाळूसंदर्भात सरकार पारदर्शी धोरण आणत असताना महसूल विभागातील अधिकारी मात्र आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. काहीजण वाळूच्या ठेकेदारांकडून हप्ते घेत आहेत. त्यामुळे आमच्याच लोकांची आम्हाला लाज वाटते.

Radhakrishna Vikhe Patil
Maharashtra Politic's : भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार अन्‌ अपराधी आहेत : शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

वाळू तस्कराकडून लाच घेताना काल कोपरगावचा तहसीलदार पकडला गेला आहे. लाचलुचपत विभागाने त्याला वाळूचा हप्ता घेताना रंगेहाथ पकडला आहे. त्यामुळे आमच्याच लोकांची आम्हाला लाज वाटते. सरकारी धोरण आम्ही एकीकडे पारदर्शी आणतोय आणि आमचाच तहसीलदार हप्त घेतोय, त्यामुळे अशा ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे आम्हालाही आमची कधी कधी लाज वाटते, अशी कबुली राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Radhakrishna Vikhe Patil
BJP Minister twitters: शाहांपासून शिंदेंपर्यंत.. कोणत्याही केंद्रीय मंत्र्याच्या ट्विटर बायोमध्ये 'भाजप'चा उल्लेख नाही? काय आहे कारण?

गोरगरिबांना वाळू स्वस्तदरात मिळावी, यासाठी आम्ही कडक पाऊल उचलणार आहोत. या कामात जे आडवे येतील, त्यांना सरळ करण्याची माझी भूमिका राहणार आहे, असा स्पष्ट इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

Radhakrishna Vikhe Patil
Maharashtra Politic's : मलाही एकनाथ शिंदेंकडून ऑफर होती : शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नियमबाह्य कामांचा आग्रह धरत असतील. नियमबाह्य काम असेल तर अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकण्याचे काही एक कारण नाही. पण, पण जे नियमांत आहे किंवा जे आपण नियमात बसवून करू शकतो. त्यावेळी मदत करण्याची भूमिका अधिकारी लोकांनी घेतली पाहिजे. जे करणं शक्य आहे, त्यामुळे या विषयासंदर्भात मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना राहील की भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांच सूपूर्ण सन्मान झाला पाहिजे. त्यांचा अवमान होईल, असे वर्तन अधिकऱ्यांकडून होत काम नये, अशी सूचनाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com