तौफिक शेख यांचा व्हिडिओ खासदार ओवेसींकडे

या दौऱ्यात तौफिक शेख यांच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल.
Asaduddin Owaisi-Farooq Shabdi
Asaduddin Owaisi-Farooq ShabdiSarkarnama

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत सोलापूर ‘एमआयएम’चाही अहवाल पाठविण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये या प्रकरणी कार्यवाही अपेक्षित असल्याची माहिती ‘एमआयएम’चे सोलापूर शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी रविवारी दिली. (Video of Taufiq Sheikh's speech at NCP rally was sent to Owaisi)

ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोलापुरात आल्यानंतर तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन जोरदार भाषण केले होते. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धारही त्यांनी त्या मेळाव्यात बोलून दाखविला होता. सोलापुरातील एका विकासकामाच्या उद्‌घाटनप्रसंगी शहराध्यक्ष शाब्दी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

Asaduddin Owaisi-Farooq Shabdi
आमदार देशमुखांचे चिरंजीव कोठेंच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

एमआयएमचे शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले की, तौफिक शेख यांनी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही किंवा त्यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिलेला नाही. सध्या जी वस्तुस्थिती आहे, त्याबाबतचा अहवाल आम्ही खासदार ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलिल यांना पाठविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुक्रवारी मेळाव्यात झालेल्या सर्व घडामोडी कळविण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ‘एमआयएम’चे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. कदाचित या दौऱ्यात तौफिक शेख यांच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल.

Asaduddin Owaisi-Farooq Shabdi
महेश कोठेंना बालेकिल्ल्यातच अडकविण्याचा विजयकुमार देशमुखांचा मास्टर प्लॅन

सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ने जोरदार तयारी सुरु केली आहे. मधल्या काळात कोरोनामुळे विकासनिधी मिळण्यास अडचणी येत होत्या. आता विकासनिधी मिळू लागल्याने एमआयएम नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे सुरु होत असल्याचेही शहराध्यक्ष शाब्दी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com