राज्यसभेत बहुमत मिळताच भाजप नेत्याचे समान नागरी कायद्याबाबत मोठे वक्तव्य!

राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या शंभर झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही पक्षाचे बहुमत झाले आहे.
 BJP
BJPsarkarnama

रत्नागिरी : ‘‘राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या (bjp) खासदारांची संख्या शंभर झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही पक्षाचे बहुमत झाले आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेमध्येही बहुमत झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit saha) लवकरच बहुप्रतिक्षित समान नागरी कायदा (Uniform Civil Code) मंजुरीसाठी आणतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे केंद्र सरकार समान नागरी कायदा बहुमतांनी मंजूर करून घेईल,’’ असा विश्वास रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. (Uniform Civil Code will be passed by a majority : Adv Deepak Patwardhan)

 BJP
उद्धवजी, पुन्हा सांगतो... सावध राहा : राऊतांच्या भूमिकेवरून चंद्रकांत पाटलांचा सल्ला

जिल्हाध्यक्ष ॲड पटवर्धन हे रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील विश्वास व्यक्त केल आहे. कार्यकर्त्यांसमोर बोलताना ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, राज्यसभेमध्ये १९८८ नंतर प्रथमच कोणत्याही एका पक्षाचे १०० खासदार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षांत अनेक निर्णय हे हिंदुस्थानाच्या राष्ट्रवादी विचारधारेनुरूप घेतले आहेत.

 BJP
आवाडेंनी आमची काळजी करू नये : नाराजीच्या विधानावरून काँग्रेस आमदार पाटलांचा टोला

श्री प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण उपक्रम, काश्मीरचा स्वतंत्र दर्जा रद्द करणारे ३७० कलम हटविणे. ते करताना काश्मीरच्या विभाजनाचा निर्णय घेतला. आर्थिक निकषांवर आधारित १० टक्के आरक्षण दिले आहे. काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा विकास, असे अनेक निर्णय हिंदुस्थानातील बहुसंख्य राष्ट्रप्रेमी जनतेच्या मतानुसार घेतले आहेत. जनमाणसांमध्ये या निर्णयामुळे कमालीचा आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे. याचेच प्रत्यंतर चार राज्यांमधील विधानसभांमध्ये भारतीय जनता पक्षाला प्राप्त झालेल्या विजयामुळे आले आहे. आता बहुप्रतिक्षित समान नागरी कायदा मंजूर व्हावा, अशी देशवासियांची मागणी आहे. हे विधेयक मंजूर होईल, असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com