उद्धवजी, ‘ते’ शब्द परत घ्या : देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना आवाहन

एकनाथ शिंदे यांच्या नातवाला उद्धव ठाकरे यांनी बोलून टार्गेट केले आहे, त्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतो.
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासारख्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नातवाचा उल्लेख करून केलेली टिप्पणीबद्दल मला अत्यंत वाईट वाटलं. तुमचं आणि शिंदे यांचं पटत नसेल...निराशा असेल, तरीही काही पथ्ये ही पाळली पाहिजेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ते शब्द जाहीरपणे परत घेतले पाहिजेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्या त्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. (Uddhavji, take back the that word : Devendra Fadnavis)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. ठाकरे म्हणाले होते की, बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवकपदावर डोळे लावून बसलाय... एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यावर टीका केल्याने ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी नाराजी दर्शविली.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा

फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मी माझी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, मला एका गोष्टीचं मनापासून वाईट वाटतं. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या एका नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा उल्लेख करून त्याच्यावर टिप्पणी करणे, हे अतिशय खालच्या दर्जाचं आहे. मला तर असं वाटतंय की, उद्धव ठाकरे यांनी आपले ते शब्द जाहीरपणे परत घेतले पाहिजेत. आपण कुठं चाललो आहोत. त्याचं वय दीड वर्षाचं आहे, अशा नातवावर आपण टीकाटिप्पणी करायला लागलो आहोत.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करणार; पण ‘या’ गोष्टींसाठी वेळ वाढवून मागणार

एकवेळ समजू शकतो की तुमचं आणि मुख्यमंत्री शिंदे यांचं पटत नाही... निराशा असेल... तरीदेखील टीका करताना काही पथ्ये ही पाळली पाहिजेत. एकनाथ शिंदे यांच्या नातवाला उद्धव ठाकरे यांनी बोलून टार्गेट केले आहे, त्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतो. ठाकरे यांनी हे शब्द परत घेतले पाहिजेत, अशी माझी अपेक्षा आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com