`उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदी, ही तर निव्वळ पुडी!` : राऊत यांची स्फोटक मुलाखत

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची `साम टिव्ही`ला खास मुलाखत
`उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदी, ही तर निव्वळ पुडी!` : राऊत यांची स्फोटक मुलाखत
Sanjay RautSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Govt) दोन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि या महाविकास आघाडीचे एक शिल्पकार यांनी स्फोटक मुलाखत `साम`टिव्हीला दिली. उद्धव ठाकरे हे पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याचे स्पष्ट करत ते अडीच वर्षे या पदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ पुडी असल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर शिवसेनेकेड मुख्यमंत्रीपद प्रदीर्घ काळ असेल, असे सांगत ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री, असे काही नसेल असे म्हणत इतर दोन्ही काॅंग्रेसच्या पोटात गोळा आणला आहे.

राऊत म्हणाले की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत असतानाच मी शरद पवार यांच्याशी बोलत होतो. त्यामुळे नक्की काय ठरलं, हे मला माहीत. त्यामुळे 2024 पर्यंत मुख्यमंत्री पूर्ण कालावधीने काम करतील यात शंका नाही. त्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. राष्ट्रवादी काॅंग्रेसने 2004 मध्ये आपले आमदार जास्त असतानाही काॅंग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले होते, याची आठवणही त्यांनी या निमित्ताने करून दिली.

उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाबद्दल बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम आहे. त्यांच्यावर नाजूक सर्जरी जाली. त्यातून बरे व्हायला त्यांना वेळ लागेल. त्यांचे माझे आजच बोलणे झाले. त्यांच्या आवाजात धार होती. त्यांना मी तसे म्हणालोही. त्यावर फिजिओथेरपी झाली की आवाजाला धार येते, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री हे लाखांचे पोशिंदेे आहे. त्यांनी आराम करावा आणि ठणठणीत बरे होऊन ते रुग्णालयातून बाहेर येतील.

Sanjay Raut
तर, फडणवीसांना येरवड्यात दाखल करावं लागेल - संजय राऊत

आमच्या सरकारला तीन चाकी रिक्षा म्हणा अथवा काही म्हणा पण आमचे उत्तम चालू आहे. हे सरकार प्रदीर्घ काळासाठी बनले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालच्या आधी आम्ही महाराष्ट्रात `खेला होबे` केलं. निवडणूक एकत्र लढून सरकार स्थापन करण सोपं असतं. पण वेगळं लढून नंतर एकत्र येणे हे कठीण असते. तो खरा खेळ असता. महाराष्ट्रात ते करून दाखवले. आता सरकार पडायची वेळ निघून गेली. अशी सरकारे पाडता येत नाहीत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र वेगळा आहे, याची जाणीव ठेवायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut
...म्हणून मला मंत्री व्हावे असे वाटले नाही : संजय राऊत

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आगामी निवडणुकीत काॅंग्रेस स्वबळावर लढण्याचा दावा करत असल्याचे विचारल्यानंतर राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वाद होतात, असे स्पष्ट केले. भाजपसोबत युतीत होतो तेव्हाही महापालिका निवडणुका आम्ही वेगळे लढलो. तिथे स्थानिक कार्यकर्ते जोरात असतात. धोरणात्मक निर्णय नसतो. तिन्ही पक्षांची आघाडी झाली तर कार्यकर्त्यांना तिकिट देणे अवघड असते. स्थानिक निवडणुकांत कार्यकर्त्यांना सामावून घेता येत नाही, असे सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in