काळा तिट ते खोटेपणा : ठाकरे विरुद्ध राणे यांची राजकीय जुगलबंदी जशीच्या तशी!

चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात वाद रंगला.
Narayan Rane- Uddhav Thackeray
Narayan Rane- Uddhav Thackeraysarkarnama

सिंधुदुर्ग : येथील चिपी विमानतळाच्या उदघाटन प्रसंगात शिवसेना (Shivsena) आणि नारायण राणे (Narayan Rane) आमनेसामने आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत बऱ्याच वर्षांनंतर राणे हे या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले दिसले. या कार्यक्रमात राजकीय टीकाटिप्पणी होणार, याची चुणूक दोन दिवस आधीच आली होती आणि तसेच झाले. थेट `तू तू, मैं मैं` झाले नाही किंवा आक्रमक वाक्ये गेली नाहीत, हेच नशीब!

Narayan Rane- Uddhav Thackeray
त्या' घटनेनंतर उद्धव ठाकरे यांच्या उजव्या हाताला नारायण राणे बसणार

या विषयावर राजकारण करायचे नाही, असे म्हणत राणे यांनी जोरदार टोलेबाजी केली. हा कार्यक्रम नक्की कोणाचा आहे, येथून त्यांनी सुरवात केली. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य, सुभाष देसाई विनायक राऊत या नेत्यांची नावे घेऊन सल्ले दिले. त्यामुळे समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याची परतफेड केली.

त्यांनीही चांगल्या कार्यक्रमाला नजर लागू नये म्हणून काळा तिट लावतात, तसे काही लोक येथे बसलेले आहेत, असे सांगत आपण कोणाविषयी बोलत आहोत, हे दाखवून दिले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. राणे यांच्या भाषणाच्या वेळी शिवसैनिकांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर घोषणा नको, असे राणेंनी सुनावले. त्यानंतर त्या थांबल्या. राणे आणि ठाकरे हे एकमेकांशी फार बोलले नाहीत. मुख्यमंत्री माझ्या कानात काही कुजबुजले पण ते मला ऐकू आले नाही, अशीच आपल्या भाषणाची राणे यांनी सुरवात केली.

Narayan Rane- Uddhav Thackeray
`शिवसेनेतील हप्तेखोर नेते कोण, हे नारायण राणे यांनी जाहीर करावेच!`

राणे यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे :

-आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी इथं आलो आहे. विमानं पाहिलं आणि खूप बरं वाटलं. देश विदेशातून पर्यटक सिंधुदुर्गात यावे आणि व्यवसाय वाढून आर्थिक समृद्धी व्हावी असं वाटतं.

-विनायक राऊत विमानात पेढा घेऊन आले. मी त्यांना म्हणालो , ''पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. तो आत्मसात करा''

- या विमानतळाच्या उदघाटनासाठी जे येथे आलेले त्यांच्यासाठी मी देवांना गाऱ्हाणं घालेन. यांच्या इच्छा पूर्ण कर, इडा पीडा दूर कर पण आमच्या कोकणाचा विकास होऊ दे.

-मी मुख्यमंत्री झाल्यानंतर येथे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठी पैसे मिळाले. मी कोकणाच्या विकासासाठी झटलो. बाकी कोणी जवळपास येऊच शकत नाही.

-मी विमानतळाच्या कामाचे श्रेय घेत नाही. पण या विमानतळाला ज्यांनी विरोध केला ते आज व्यासपीठावर बसले आहेत. मी नावे घेतली तर राजकारण होईल.

-उद्धव ठाकरेंनी माणसे तपासून घ्यावीत. प्रोटोकाॅल तरी पाळा. खोटेपणा असलेली माणसे बाळासाहेब ठाकरेंना अजिबात आवडत नव्हती.

-आदित्य ठाकरे आता पर्यटनमंत्री झाले आहेत. त्यांनी या प्रोजेक्टचा अभ्यास करावा. टाटाचा 581 पानांचा रिपोर्ट वाचावा. मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटावा.

-हा कार्यक्रम एमआयडीसीचा आहे की कोणाचा? विनायक राऊत यांच्या हातात माईक कसा?

-अजित पवारांनी दिलेले पैसे कोणी अडवले? (अजित पवार डोक्याला हात लावून बसले)

- विमानतळ झालं. पण येथे उतरल्यावर काय खड्डे पाहावे?

-उद्धव ठाकरेंनी काम करून दाखवावे. मला अभिमान वाटेल.

Narayan Rane- Uddhav Thackeray
राणे, ठाकरे शेजारी बसले पण एकमेकांकडे बघितलं नाही अन् बोललेही नाहीत!

उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर

-बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोक आवडत नव्हती. खोटं बोललं तर गेट आऊट! विकासात पक्षभेद मी आणत नाही. तुमच्या (नारायण राणे यांच्या) कॉलेजबाबत मी तत्काळ परवानगी दिली.

-नारायणराव आपण लघु, सुक्ष्म उद्योग खात्याचे मंत्री आहात. पण केंद्रीय मंत्री आहात. आपण विकासकाम नक्की कराल.

-शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला, हे तरी आपल्याला मान्य आहे. नाही तर काही जण आपणच तो किल्ला बांधला, याचे श्रेय घेत बसले असते.

-तलवार चालवायची वेळ आली तर देशाच्या ,राज्याच्या शत्रूवर चालली पाहिजे.आपापसांत चालायला नको. संधी मिळाली आहे त्याचे सोनं करायला हवं. माती करायला नको.

-कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं.

-पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com