उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात तीन वेळा बोलणे झाले आणि चक्रवर्तींचे नाव ठरले!

हंगामी मुख्य सचिवपदी (Chief Secretary of Maharashtra) का होईना महिला अधिकारी येईल, ही अपेक्षा या वेळी पूर्ण झाली नाही.
uddhav thackray-ajit pawar
uddhav thackray-ajit pawarsarkarnama

मुंबई : सीताराम कुंटे (IAS Sitaram Kunte) यांना मुख्य सचिव पदासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळेल, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न केले. मात्र ते रुग्णालयात दाखल असल्याने थेट दिल्लीला फोन करून काम मार्गी लावण्यासाठीचा वेळ त्यांना झाला नाही. त्यामुळे सीताराम कुंटे यांना मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारचा होकार मिळाला नाही. तो होकार न दिल्याने देवाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांना आज हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे देण्यात आली.

uddhav thackray-ajit pawar
उद्धव ठाकरेंच्या एका फोनवर मोदींकडून मिळू शकला असता 'ग्रीन सिग्नल'!

सीताराम कुंटे आज (३० नोव्हेंबर) निवृत्त होत असल्याने हंगामी कार्यभार कुणाला सोपवायचा याबद्दल दुपारनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली. सेवाज्येष्ठतेनुसार वंदना कृष्णा, दिल्लीत प्रतिनियुक्तीवर असणारे श्‍यामलाल गोयल आणि देवाशिष चक्रवर्ती यांची नावे हंगामी मुख्य सचिवपदासाठी विचारात घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून कार्यभार पाहत आहेत. आज दिवसभरात सुमारे तीन वेळा त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनी केला असे समजते. वंदना कृष्णा सर्वांत ज्येष्ठ असल्याने किमान हंगामी काळासाठी का होईना पण महाराष्ट्राला महिला मुख्य सचिव मिळेल असे मानले जात होते. परंतु अर्थ, गृहनिर्माण अशा खात्यांचा कार्यभार सांभाळलेल्या चक्रवर्ती यांचे नाव पुढे आले. मंत्रालयात सायंकाळी उशिरा कुंटे यांनी पदभार सुपूर्द केला.

uddhav thackray-ajit pawar
ठाकरेंच्या मर्जीतील कुंटे 'आऊट' अन् चक्रवर्ती राज्याचे बनले मुख्य सचिव

कुंटे आता सल्लागार
मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेल्या सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील आदेश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com