Dussehra Melava :सोलापुरातून दोन हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. तेच शिवसैनिकांचे खरे भांडवल आहे.
Solapur Shivsena Meeting
Solapur Shivsena MeetingSarkarnama

सोलापूर : शिवसेनेच्या (Shivsena) मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी (Dussehra melava) सोलापूर (Solapur) शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दोन हजार शिवसैनिक जाणार आहेत, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक शुक्रवारी (ता. ३० सप्टेंबर) रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहावर झाली. (Two thousand Shiv Sainiks will go to Dussehra melava from Solapur)

जिल्हाप्रमुख बरडे म्हणाले की, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तो विचार नाही. परिणामी बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा काहीही उपयोग होणार नाही. शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य माणसे शिवसेनेबरोबर येण्यास तयार आहेत. ही पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे.

Solapur Shivsena Meeting
मुख्यमंत्र्यांना साफसफाई करायची की हाथसफाई? : नीलम गोऱ्हेंचा शिंदेंना टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. तेच शिवसैनिकांचे खरे भांडवल आहे. त्यामुळे सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी अतिशय गांभीर्याने या विषयात काम करावे. शिवसैनिकांना मिळालेल्या या लढाईच्या संधीचे सोने शिवसैनिकांनी करावे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले.

Solapur Shivsena Meeting
रक्ताची नाती कधीही संपत नसतात; पण... : पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

या वेळी शिवसेना राज्य विस्तारक शरद कोळी, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, शहर प्रमुख भक्ती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

Solapur Shivsena Meeting
आमदारांना माहित नसलेला पंढरीचा विकास आराखडा कुणी तयार केला : भालकेंचा हल्लाबोल

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, माजी विरोधी पक्षनेता रमेश व्हटकर, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड, रेवण पुराणिक, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, आदी उपस्थित होते. शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपूरी यांनी प्रास्ताविक केले. शहर संघटक अतुल भवर यांनी सूत्रसंचालन तर उपशहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com