'Trail of an Assassin| तब्बल 32 वर्षांनंतर राजीव गांधींच्या हत्येचे उलगडणार रहस्य...

'Trail of an Assassin | 21 मे 1991 रोजी 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम' या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटात राजीव गांधींची हत्या केली होती.
Rajiv Gandhi
Rajiv Gandhi

मुंबई : 21 मे 1991 रोजी 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम' या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटात राजीव गांधींची हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता. त्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हत्येच्या घटनेवर आधारित वेब सिरीजची निर्मिती करत आहे. लेखक अनिरुद्ध मित्रा यांच्या 'नाइन्टी डेज: द ट्रु स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असॅसिन' या पुस्तकावर आधारित ही वेब सिरीज तयार केली जात आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर करणार आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागेश कुकुनूर यांनी यापूर्वी 'सिटी ऑफ ड्रीम'साठी अॅप्लाज एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली होती जी खूप हिट ठरली. राजीव गांधी यांच्या हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरुन गेला होता. या घटनेनंतर घडलेल्या अनेक घटनांवर ९० डेड या वेब सिरीजमधून प्रकाश टाकण्यात येणार आहे.

Rajiv Gandhi
'राज्याचे आरोग्य अडाण्यांचा हातात' : तानाजी सावंतांवर जगतापांची बोचरी टीका

कंटेंट स्टुडिओ अॅप्लॉज एंटरटेनमेंटने अलीकडेच टेंशन, गांधी आणि स्कॅम 2003 यासह अनेक रोमांचक प्रोजक्ट्सची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी अनिरुद्ध मित्रा यांच्या पुस्तकाचे हक्कही मिळवले आहेत. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात माजी पत्रकार अनिरुद्ध मित्रा हे त्यावेळी शोधपत्रकारिता करत होते. या हत्येचा तपासादरम्यान मारेकऱ्यांबाबत माहिती मिळवणाऱ्यामधले एक होते. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने त्यांच्या हत्येचा कट कसा उघडकीस आणला, मारेकऱ्यांची ओळख कशी पटवली आणि हत्येच्या मास्टरमाइंडला कसे जगा समोर आणले, या सर्व घटनां या सिरीजमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे.

अॅप्लॉज एंटरटेनमेंटचे सीईओ समीर नायर म्हणाले की, "आतापर्यंत देशातील सर्वसामान्य लोकांना राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल केवळ बातम्यांमधून माहिती मिळाली. पण आता भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या हत्याकांडाचे नाट्यमय दृश्य लोकांना या बेव सिरीजमधून पाहायला मिळणार आहे. ही हृदयस्पर्शी कथा समकालीन प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांच्यासोबत पुन्हा एकदा सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.

'राजीव गांधींच्या हत्येवर लिहिलेल्या ९० डेज: द ट्रू स्टोरी ऑफ द हंट या पुस्तकाद्वारे एक रोमांचक आणि थरारक कथा बनवण्यास मी खूप उत्सुक आहे. अॅप्लॉज एंटरटेनमेंट सोबत भागीदारी करणे हा नेहमीच समृद्ध करणारा आणि समाधान देणारा अनुभव आहे आणि तो कसा बाहेर पडतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. ९० डेज ही राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या शोधाची खरी कहाणी, मी भारतात सुरू केलेल्या सर्वात मोठ्या शोधाची निश्चित माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. दृकश्राव्य स्वरूप कथेचे अनेक पैलू आणि स्तर अतिशय सूक्ष्म आणि मनोरंजक पद्धतीने मांडते. मला खात्री आहे की ही मालिका खूप रोमांचक होईल.' अशी भावना दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in