महाआघाडी सोबतच्या बैठकीनंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी भाजप नेत्यांना दिला हा निरोप....

मुळात पार्टीचा एबी फॉर्म लावलेला तिसरा उमेदवार मागे घेणे, हे मुळात आमच्या पातळीवर शक्यच नाही.
Rajya Sabha Election
Rajya Sabha Election sarkarnama

मुंबई ः ‘‘महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना जशी त्यांना आघाडीची काळजी आहे, तशी आम्हालाही आमच्या पक्षाची काळजी आहे. आमची काही ध्येयधोरणं, प्रघात, पायंडे आहेत. मुळात पार्टीचा एबी फॉर्म लावलेला तिसरा उमेदवार मागे घेणे, हे मुळात आमच्या पातळीवर शक्यच नाही. कारण आम्हाला सहकाऱ्यांशी आणि दिल्लीशी बोलावे लागेल. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘तुमची भूमिका बरोबर आहे आणि यू गो दिस स्टॅण्ड...’ असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर सांगितले. (This message was given to the maharashtra BJP leaders by the party leaders in Delhi ....)

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपला विधान परिषदेच्या अतिरिक्त जागेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, ती ऑफर फेटाळून लावत तीच ऑफर भाजपने महाविकास आघाडीला दिली आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Rajya Sabha Election
पिंपरी-चिंचवडची जबाबदारी मिळताच अजितदादांनी लावला कामाचा धडाका!

महाविकास आघाडीकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीकडून भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, त्याबदल्यात भाजपला विधान परिषदेची एक वाढीव जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, भाजपने ती ऑफर फेटाळून लावत तीच ऑफर महाविकास आघाडीला दिली आहे, त्यामुळे कोण माघार आणि कोण बिनविरोध होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rajya Sabha Election
लबाड्या करणाऱ्या दूध संघाच्या संचालकांना जेलमध्ये पाठवा : मोहितेंची केदारांकडे मागणी

या बैठकीनंतर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही विधान परिषदेची पाचवी जागा लढणार नाही. तुम्ही आता राज्यसभेचा दुसरा उमेदवार मागे घ्या, असे आम्ही महाविकास आघाडीला सांगितले आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते हे आम्ही आमच्यात आपापसांत विचार करतो, असे सांगून निघून गेले आहेत. आम्हीही आपापसांत विचार करतोच. कारण आमच्याकडे कम्युनिकेशन सिस्टिम (सहभाग) खूप आहे. परंतु आम्ही तिसरा जागा लढविण्यावर आणि ती जिंकण्यावर कॉन्फिडंट आहोत. महाविकास आघाडीने जर आमची ऑफर मान्य केली नाही तर आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार.

‘‘राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती आम्ही भाजपला केली होती. त्याबदल्यात आम्ही विधान परिषदेची एक जागा वाढीव देतो, अशी ऑफर आम्ही महाविकास आघाडीकडून भाजपला दिली आहे,’’असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com