Satyajit Tambe News : राज्यात पुन्हा भूकंप होणार...सत्यजीत तांबे लवकरच घेणार मोठा निर्णय

Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
Satyajit Tambe News
Satyajit Tambe NewsSarkarnama

Satyajit Tambe Latest News : नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजपचे नेते थेट सत्यजीत तांबे यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर देत आहेत. मात्र, तांबे यांनी आपण अपक्षच असल्याचे सांगितले असले तरी थोड्याच दिवसात सत्यजीत यांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होऊ शकतो.

काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता, सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या, तांबे पिता-पुत्राचे काँग्रेसने निलंबन केले. त्यानंतर महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगा पाटील यांना पाठिंबा दिला.

Satyajit Tambe News
BJP offers Satyajit Tambe : सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान ...

भाजपने (BJP) या मतदार संघात आपला अधिकृत उमेदवार दिला नाही. तसेच आपल्या दोन्ही उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे संपूर्ण भाजप सत्यजीत तांबे यांच्या प्रचारासाठी झटली. भाजपने थेट पाठिंबा दिला नसला तरी स्थानिक नेत्यांनी सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचे काम करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहिर केले होते.

तेव्हाच सगळे गणित समोर आले होते. भाजपने थेट पाठिंबा न देता, स्थानिक पदाधिकाऱ्यांना पुढे करत पळवाट शोधली. पडद्यामागे मात्र, संपूर्ण भाजप तांबे यांच्यासाठी झटत होती. तसेच आज (ता.31) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांना थेट पक्षात येण्याचीच ऑफर दिली. ते म्हणाले पक्षात येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. भाजपमध्ये अनेक लोक आले आहेत. ते पक्षात आल्यास कुणालाही अडचण नाही. मग सत्यजीत तांबे असो किंवा आणखी कुणी असो. त्यांचेही स्वागत करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, पदवीधरची निवडणूक जाहीर होण्याच्या आधी नगरमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्यांची आणि सत्यजीत तांबे यांनी बैठक झाल्याची चर्चा होती. त्याच बैठकीत अपक्ष लढणे आणि नंतर भाजप-शिंदे गटाचा पाठिंबा आणि नंतर प्रवेश असे सगळे ठरल्याची चर्चा आहे. त्याच बैठकीत हे पुढील सगळे नियोजन ठरले होते, असे सांगितेल जात आहे.

प्रत्येक निवडणूक ताकदीने लढणाऱ्या भाजपने नाशिकमध्ये कोणालाच उमेदवारी न देता, तसेच आपल्या इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरले असताना सुद्धा त्यांना माघार घ्यायला लावली, आणि सत्यजीत तांबे यांच्यासाठी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली, 'इतनी मेहरबानी क्यू भाऊ' असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Satyajit Tambe News
Ncp News : मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीतून प्रवास अन् बंद दाराआड चर्चा

तसेच सत्यजीत तांबे यांना अपक्ष उभे करुन काँग्रेसचा (Congress) हमखास निवडणूक येणारा एक आमदार भाजपने कमी केला. त्यामुळे काँग्रेसचे विधान परिषदेतील संख्याबळ देखील घटनार आहे. आपला निवडणून आणता आला नाही तरी विरोधकांचा करा, असा खेळ भाजपने कला आहे. आता तर काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचे निलंबन केले आहे. अपक्ष असल्यामुळे त्यांच्यासाठी भाजप प्रवेश सोपा आहे. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधी पर्यंत आपले पत्ते सत्यजीत तांबे यांनी आणि भाजपनेही ओपन केले नव्हते, तसेच ते आताही ओपन केले नाहीत, मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांबे लवकरच भाजपवाशी होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com