एकनाथ शिंदेंचे पुढचे टार्गेट जितेंद्र आव्हाड; नवी मुंबईतील समर्थकांवर टाकले जाळे!

Jitendra Awhad : नवी मुंबईत राष्ट्रवादी नगरसेवक शिंदे गटात गटाच्या वाटेवर आहेत
Jitendra Awhad, Ganesh Naik, Eknath Shinde
Jitendra Awhad, Ganesh Naik, Eknath Shindesarkarnama

Jitendra Awhad : नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नवी मुंबईतील सुमारे अर्धा डझन नगरसेवक राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. सर्वजण एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असून येत्या काळात अन्य पदाधिकारीदेखील राष्ट्रवादी सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी अडचण होणार आहे. भाजप (BJP) आमदार गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकेकाळचे शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेले कट्टर शिवसैनिक आहेत. दोघांनीही एकत्रितपणे आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वळवला आहे. नवी मुंबईत गणेश नाईकांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पक्ष सावरण्याची जबाबदारी आव्हाडांनी घेतली होती. त्यातून आव्हाड सावरत नाहीत तोवरच आता त्यांना दणका देण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे.

Jitendra Awhad, Ganesh Naik, Eknath Shinde
1. 54 लाख कोटींची प्रक्लप गुजरातला; उद्योगमंत्री सामंत म्हणतात माहिती घेतोय

त्यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईतच नाईक आणि शिंदे यांनी आव्हाडांची कोंडी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतले नगरसेवक लवकरच शिंदे गटात जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. नुकतेच नवी मुंबई जिल्हाध्यक्षानेही आव्हाडांवर आरोप करुन पक्ष सोडला होता. गणेश नाईकांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपुष्टात आणले आहे. त्यानंतर शिंदेंनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची नवी मुंबई महापालिकेत सत्ता होती. त्याचे कारण होते, माजी मंत्री नाईक. नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली. ती ताकद वाढवण्याची जबाबदारी आव्हाड यांनी घेतली होती. मात्र, त्यांच्यावर गटबाजीचे आरोप झाले. त्यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादीला सावरण्याचे आव्हान आव्हाड यांच्या समोर असणार आहे. त्यांना नाईक आणि आता शिंदे गटाला टक्कर द्यावी लागणार आहे.

Jitendra Awhad, Ganesh Naik, Eknath Shinde
सरकार बदलल्याचा इफेक्ट इंदापुरात दिसला; राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याच बरोबर नवी मुंबईवरही शिंदे आणि भाजपचा डोळा आहे. पहिल्या टप्प्यात सहा नगरसेवक आले असले तरी येत्या काही दिवसात आणखी नगरसेवक व पक्ष संघटनेतील पदाधिकारी राष्ट्रवादीला रामराम करत शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद होती. नाईक यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे. यातूनही नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर पक्ष आणखी क्षीण होणार आहे. या सगळ्या प्रकणाला आव्हाड कसे तोंड देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in