काँग्रेसचा मोठा नेता १५ ते २० आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार; ज्येष्ठ आयपीएस अधिकारी करताहेत मध्यस्थी?

Congress News : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा 'भूकंप' होणार...
Congress, bjp News
Congress, bjp NewsSarkarnama

Congress News : सहा महिन्यांपूर्वी शिवसेना (Shivsena) दुभंगली. त्याची परिणती महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आले. आता भाजपने (BJP) शिवसेनेसारखीच मोठी फूट कॉंग्रेसमध्येही पाडण्याच्या हालचाली सुरु केल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्यांनी मोठ्या नेत्याला गळाला लावले आहे.

पक्षाने साइडलाईन केल्याने हे नेते सध्या नाराज आहेत. त्यांच्यासारखेच अनेक आमदार पक्षात नाराज आहेत. त्याचाच फायदा उठवत भाजपने त्यांना गळाला लावले आहे. या नेत्यांवर एका मोठ्या घोटळ्याचे आरोप झाले होते. आता राज्यातही सत्तेत आलेली भाजप तो बाहेर काढण्याची भीती त्यांना वाटते आहे. त्यातूनच भाजपमध्ये गेलेले बरे, अशी त्यांची मानसिकता झाली, असल्याचे समजते.

Congress, bjp News
Old Pension scheme : शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांनी टाकला मोठा डाव; राजकीय पक्षांची केली कोंडी

त्यांच्याबरोबर तूर्त १८ ते २० आमदार पक्ष सोडणार असल्याचे समजते. त्यात मुंबईतील एक आमदार तथा माजी मंत्री आहेत. विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याने पक्षांतर बंदी कायद्याची भीती झुगारून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. त्यादृष्टीने सर्वकाही या नेत्याच्या व त्याच्या समर्थक आमदारांच्या मनासारखे घडले, तर येत्या पंधरा दिवसांत आणखी एक मोठी राजकीय घडामोड तथा उलथापालथ राज्यात होण्याची शक्यता आहे.

Congress, bjp News
Sharad Pawar News : पवारांनी शिंदे गटातील आमदार खासदारांची डोकेदुखी वाढवली; स्पष्टच सांगितले...

गेल्या दोन महिन्यांपासून भाजपचे हे कॉंग्रेस (Congress) तोडो ऑपरेशन पडद्यामागे सुरु आहे. त्याला गेल्या काही दिवसांत आणखी गती देण्यात आली आहे. त्यासाठी ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला हाताशी धरण्यात आले, असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुण्याशी सबंध आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अत्यंत मर्जीतील हे अधिकारी या कामगिरीसाठी नुकतेच दिल्लीला जाऊन, आल्याचीही माहीती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही ते भेटले, असल्याचे सांगण्या येत आहे. त्यांनी त्यांच्यांशी यासंदर्भात बोलणीही केल्याचे कळते. दुसरीकडे हे नेते स्वत: भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, आणि फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com