Shivsena News : सात लोकांमुळे शिंदें गटाचा गेम फसणार? आयोगाच्या लढाईत ठाकरेंनी टाकला डाव...

Eknath Shinde News : खरी शिवसेना कुणाची या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Eknath Shinde, Uddhav Thackeray News Sarkarnama

ShivSena News : खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. यासाठी मंगळवारी आयोगात सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाने शिंदे गटाच्या कागद पत्रांवर आक्षेप घेतला. त्यामुळे शिंदे गट अडचणीत येणाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाकडून दाखवण्यात आलेल्या 7 जिल्हाप्रमुखांचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले शिंदे गटाने निवडणूक आयोगात सांगितले की, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमच्याकडे आले. त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून कधीच दूर केले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Congress : भारत जोडोनंतर कॉंग्रेसचे लक्ष्य ‘हाथ से हाथ जोडो’, सहभागी नसलेल्यांची पदे काढणार !

ते जे सांगताहेत की, खासदार आमच्याकडे आले, आमदार आमच्याकडे आले. तसेच त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धआ आमच्याकडे आले असे सांगितले. म्हणजे पदावर नव्हते त्यांची नावे पदाधिकारी म्हणून दाखवली, असे सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जेव्हा शिवसेनेत बंड केले त्याच्या आधीच म्हणजे 21 जून 2022 ला. त्याच्या अगोदरच या सातही जिल्हा प्रमुखांना पदावरून दूर करण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये सांगितले की ही माणसे पदावर नव्हती. तुम्ही जिल्हाप्रमुख म्हणून दाखवता, अशी माहिती सावंत यांनी दिली.

पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये फूट दाखवण्यासाठी ते असे दाखवत आहेत. कोण किती आले? आता ते (शिंदे) स्वतः नेते होते. गजानन कीर्तीकरही नेते होते. तसेच माजी खासदार आनंदराव आडसूळ नेते होते. रामदास कदम यांच्याकडेही शिवसेनेचे नेतेपद होते. तर ते सांगू शकतात की हे चार नेते आमच्याकडे आले आहेत. मात्र, बाकीच्यांचे कसे सांगू शकतील'' असे सांगत सावंतांनी सात जिल्हाप्रमुखांबद्दलच्या मुद्द्यावर भाष्य केले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Pune By-Election: मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

खासदार कीर्तिकर तर न्यायालयात आणि निवडणूक आयोगात केस दाखल झाल्यानंतर गेले. ते सात लोक पूर्वी केव्हातरी जिल्हाप्रमुख होते. जेव्हा ते शिंदे गटात गेले, तेव्हा ते जिल्हाप्रमुख नव्हते, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. आम्ही त्यांना जिल्हा प्रमुख पदावरुन आधीच दूर केले होते. ते तिकडे गेल्यानंतर जिल्हाप्रमुख झाले. त्यांनी शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून जिल्हाप्रमुख आले, असे कसे दाखवता, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. कार्यकारिणीतील फूट दाखवण्यासाठी ते असे करत आहेत, असेही सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com