Shivsena Symbol News : ठाकरे गटाचा युक्तीवाद सादर; शिंदे गटाची अखेरच्या क्षणी धावपळ : अन्...

Shivsena News : निवडणूक आयोगात ठाकरे गटाचा 112 पानांचा आणि शिंदे गटाचा 124 पानांचा युक्तिवाद सादर झाला आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Eknath Shinde, Uddhav Thackeray News : शिवसेना पक्षा संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु आहे. त्या संदर्भात आयोगाने दोन्ही गटांना लेखी म्हणने मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी आज (ता.३० जानेवारी) लेखी युक्तीवाद सादर केला. निवडणूक आयोगात ठाकरे गटाचा 112 पानांचा आणि शिंदे गटाचा 124 पानांचा युक्तिवाद सादर झाला आहे.

आज लेखी युक्तिवाद सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे सायंकाळी 5 वाजेपर्यंत युक्तिवाद सादर करता येणार होता. अवघा एक मिनिट कमी असताना शिंदे गटाचे वकील धावत निवडणूक आयोगात दाखल झाले. आणि त्यांनी शेवटच्या क्षणी आपले म्हणणे सादर केले. आम्ही युक्तीवाद सादर केला असून लवकरच निकाल येईल असे शिंदे गटाच्या वकीलाने स्पष्ट केले.

Eknath Shinde News
Shivsena Symbol News : ठाकरेंनी आयोगात केली शिंदेंची कोंडी; लेखी युक्तीवाद सादर करत उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा

ठाकरे गटाच्या लेखी उत्तर काय?

ठाकरे गटाने दिलेल्या लेखी उत्तरात शिवसेना (Shivsena) पक्षातील बंडखोरी तारखेसह मांडली आहे. एकानाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नेमकी कशी बंडखोरी केली याबाबत माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ठाकरे गटाने आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये मांडले मुद्देच लेखी उत्तरातही मांडण्यात आले आहे.

शिंदे यांच्याकडे असणारे मुख्य नेतेपद हे घटनात्मक नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने मांडला आहे. शिंदे यांना शिवसेनेची घटना यापूर्वी मान्य होती. मात्र, आताच नेमकं काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शिंदे यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे पक्ष आमचाच आहे, असा दावा करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून रद्द करण्यात आले होते, असेही यामध्ये म्हटले आहे. 10 व्या शेड्युल नुसार या लोकांनी पक्ष सोडला, त्यामुळे ते पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी या विषयी माध्यमांना माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणाले, संपूर्ण घटनाक्रम हा 20 जून पासून सुरु झाला आहे. तेव्हापासून ते गेली सुनावणीपर्यंतच्या घटनाक्रमाविषयी माहिती सादर करण्यात आली आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद करण्यात आला, याबाबतही म्हणणे मांडण्यात आले, असे देसाई यांनी सांगितले.

तर शिंदे गटाचे उत्तर काय?

मुळ पक्ष आम्हीच आहोत असा दावा शिंदे गटाने केला आहे. एकनाथ शिंदेंची निवड लोकशाही पद्धतीने झाली आहे. शिंदे यांचे पद घटनात्मक असल्याचा दावा, शिंदे गटाने केला आहे. लोकप्रतिनिधींचे संख्याबळ जास्त आहे. बहुमत, संख्याबळ विचारात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी आम्ही पुराव्याची पुर्तता केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुळ पक्ष आमचाच, आम्हाला पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने कली आहे. तसेच संघटनात्मक पक्षाचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा दावा अयोग्य कारण निवडी लोकशाहीला धरून नाहीत, असा दावाही शिंदे गटाने केला आहे.

Eknath Shinde News
Sharad Pawar News : पवारांनी-बिर्लांची भेट घेतली अन् निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीला मोठा दिलासा; पोटनिवडणूक रद्द

ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी जो युक्तीवाद केला होता, ते मुद्दे खोडून काढले असल्याचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या सगळ्या मुद्यांना उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यनेता पद हे घटनात्मक आहे, असेही आयोगात दाखल केलेल्या युक्तीवादात स्पष्ट केले आहे. असे शेवाळे यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांची घटना वेगळी होती, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची घटना बद्दली त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या घटनेनुसार आमचे म्हणणे सादर केले असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com