Bazar Samiti Result : शिंदे गटाच्या चौथ्या मंत्र्याला धक्का; भुसे, राठोडांनंतर गुलाबराव पाटलांनी सत्ता गमावली : आघाडीने केला करेक्ट कार्यक्रम

Bazar Samiti News : बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक मंत्र्यांना धक्का बसला आहे.
Dada Bhuse, Sanjay Rathod, Gulabrao Patil News
Dada Bhuse, Sanjay Rathod, Gulabrao Patil NewsSarkarnama

Market Committee Election Results : राज्यातील बाजार समित्यांचा निकाल जाहिर होत आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. विशेष, शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का बसला. चार मंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राज्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत दहा जागा जिंकून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर मात केली. शिंदे गटाला हा जबर धक्का मानला जात आहे. भुसे यांची १५ वर्षे या समितीत सत्ता होती. हिरे यांनी नुकताच भाजपमधून (BJP) ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Dada Bhuse, Sanjay Rathod, Gulabrao Patil News
Jalgaon Bazar Samiti Result : जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडीने खाते उघडले; दिलीप काशिनाथ कोळी विजयी

त्याच बरोबर मंत्री संजय राठोड यांनाही मोठा धक्का बसला आहे. दिग्रस ही जिल्ह्यात प्रतिष्ठेची बाजार समिती आहे. या निवडणुकीत माजी मंत्री संजय देशमुख व विद्यमान मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. काल (ता. २८ एप्रिल) झालेल्या निवडणुकीत संजय देशमुख यांच्या पॅनलने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवत पालकमंत्री संजय राठोड यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे.

तर, नेर बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत कृषी उत्पन्न बाजार समितीचा गढ कायम राखण्यात यश मिळविले. काँगेस व ठाकरे गटाचा पराभव झाला. एकूण १८ संचालकासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने एकूण १० जागांवर विजय प्राप्त केला. तर उद्धव ठाकरे गट आणि काँगेस आघाडीने एकूण आठ जागा काबीज केल्या आहेत.

Dada Bhuse, Sanjay Rathod, Gulabrao Patil News
Bodwad Bazar Samiti Result : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांना धक्का; खडसे गटाची मोठी आघाडी

दुसरीकडे माढा तालुक्यातील कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी महाविकास आघाडीने सर्व जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे सावंत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एका बाजार समितीमध्ये सावंत यांना यश मिळाले आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपद निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास पॅनलने 11 जागावर आघाडी घेत बहुमताकडे वाटचाल केली. तर मंत्री पाटील यांच्या पॅनलला सहा जागा तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे.

Dada Bhuse, Sanjay Rathod, Gulabrao Patil News
Jalgaon Bazar Samiti Result : जळगावात गुलाबराव पाटलांना मोठा धक्का; देवकरांनी केला करेक्ट कार्यक्रम; आघाडीने सत्ता हिसकावली

महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना हा धक्का मानला जात आहे. जळगाव बाजार समितीत त्यांच्याच नेतृत्वाखाली सत्ता होती. ती आता खालसा झाली असून महाविकासची सत्ता स्थापन होणे निश्‍चीत झाले आहे.

दरम्यान, धरणगाव बाजार समिती मतदार संघात गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने विजय मिळवला आहे. १८ पैकी तब्बल १६ जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडी केवळ दोन जागेवरावर समाधान मानावे लागले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा गट तसेच भाजप आणि शिंदे गट एकत्र होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com