...त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली होती : चव्हाणांनंतर राऊतांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ मध्ये भाजपकडून शिवसेनेची मुस्कटदाबी सुरू होती. त्या भाजपच्या अन्यायावर एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवला होता.
Vinayak Raut-Uddhav Thackeray- Eknath Shinde
Vinayak Raut-Uddhav Thackeray- Eknath Shinde Sarkarnama

रत्नागिरी : मागील देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) सरकारच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून (BJP) होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी आवाज उठवला होता. त्यातूनच काँग्रेस (congress)-राष्ट्रवादीबरेाबर (NCP) जाऊन सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे यांच्यासह शिवसेनेचे शिष्टमंडळ अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) भेटायला गेले होते. मात्र, त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती, असा दावा शिवसेनेचे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. (That time, Uddhav Thackeray had understood Eknath Shinde : Vinayak Raut)

शिवसेनेकडून २०१४ मध्येच काँग्रेसकडे सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव आला होता. जे प्रस्ताव घेऊन आले होते, त्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vinayak Raut-Uddhav Thackeray- Eknath Shinde
PDCC Bank : अजित पवारांची महत्वाकांक्षी कर्ज योजना सुरूच राहणार की बंद होणार ?

खासदार राऊत म्हणाले की, माजी मंत्री अशोक चव्हाण जे बोलले आहेत, ते खरंच आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ मध्ये भाजपकडून शिवसेनेची मुस्कटदाबी सुरू होती. त्या भाजपच्या अन्यायावर एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवला होता. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. एकनाथ शिंदे हे भाजपच्या जवळ कसे गेले, हे सक्तवसुली संचानलयाचे (ईडी) डायरेक्टर सांगू शकतात.

Vinayak Raut-Uddhav Thackeray- Eknath Shinde
आमदारांना दिवाळी गिफ्ट; ठाकरे सरकारच्या कामांवरील स्थगिती उठवली!

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यासंदर्भातील वादावरही खासदार राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय मिळेल. निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे. आयोगाकडे सादर करण्यासाठी आम्ही बोगस कागदपत्र गोळा केलेली नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आम्ही येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा निर्धार केला आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Vinayak Raut-Uddhav Thackeray- Eknath Shinde
अशोक चव्हाणांच्या विधानामुळे शिंदेंची कोंडी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राऊत म्हणाले की, शिवसेनेतील गद्दारीची कीड रामदास कदम यांनी रुजवली आहे. रामदास कदम हे नारायण राणे यांच्याशी जाण्यास तयार होते. शिवसेनेची ताकद दसरा मेळावाला दिसेल; येणारी लोकं ही उत्स्फूर्त असतील. तसेच, आदित्य ठाकरे यांचा दौरा संपल्यानंतर उद्धव ठाकरे बाहेर पडतील, असेही राऊत यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com