पहाटेच्या शपथविधीतील तो प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी सल

दुसऱ्या दिवशी काही कामही नव्हतं आणि असं काही घडणार, होणार हे माहितीही नव्हतं.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

मुंबई : पहाटेच्या शपथविधीच्या अगोदर मी सलग आठ ते दहा दिवस प्रवास केलेला होता, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी मित्राच्या घरी गोळ्या खाऊन झोपलो होतो, मी उठलो दुपारी दोनच्या सुमारास. पण, तोपर्यंत सर्वकाही घडून गेले होते. मी कुठाय, कुणासोबत आहे, असे माझ्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते. हा प्रकार घडायला नको होता. तो दिवस टाळला असता तर फार चांगले झाले असते. ही सल माझ्या राजकीय जीवनात कायम राहील, असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रांजळपणे कबूल केले. (That morning's swearing is biggest regreat in my political life : Dhananjay Munde)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुंडे हे एका मुलाखतीत बोलत होते, त्यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा वेळी घडलेला घटनाक्रम सांगितला. याबाबत ते म्हणाले की, पहाटे पहाटे या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथविधी झाला. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सर्वजण सोबत होतो. मी सलग आठ ते दहा दिवस प्रवास केलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी आपण आराम करायचा. माझ्या शासकीय बंगल्यावर कोणीही येऊन उठवतं; म्हणून मी गोळ्या घेऊन माझ्या मित्राच्या फ्लॅटवर जाऊन झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी काही कामही नव्हतं आणि असं काही घडणार, होणार हे माहितीही नव्हतं. त्यामुळे मी दुपारी साधारण दोन वाजता उठलो. तोपर्यंत इकडे सर्वकाही घडून गेले होते. त्यावेळी माझ्यावरही टीका झाली होती. मी कुठाय, कुणासोबत आहे, असे सवाल उपस्थित करण्यात आले होते. हा सर्व प्रकार घडायला नको होता. तो दिवस टाळला असता तर फार चांगले झाले असते.

Dhananjay Munde
परळी वैद्यनाथ मंदिर उडवण्याची धमकी; मंदिर परिसरातील सुरक्षा वाढवली

याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणपासून सामाजिक न्यायमंत्रीपदाचा जीवनकाळ उलगडला. ते म्हणाले की, माझे पहिलीपर्यंतचे शिक्षण लातूरमध्ये झाले. दुसरीपासून दहावीपर्यंत मात्र परळीत शिकलो. परळीच्याच वैद्यनाथ महाविद्यालयात अकरा आणि बारावी झालो. विधी महाविद्यालयाचे शिक्षण मात्र पुण्यात झाले. माझे मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. काही जण न्यायाधीश तर काही चांगले वकीलही आहेत. राजकारणाबाहेरील मित्रांनी कधीही मला राजकारणातून बाहेर पड, असा सल्ला दिलेला नाही. उलट त्यांनी मला कायम पाठिंबाच दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

Dhananjay Munde
नेत्यांनी निवडणुकीत राजकारण केले; पण, मी बँकेवर पुन्हा येणार...

मला सिनेमाची आवड होती. शाळा बुडवून ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पहायची हौस होती. थिएटरमधील संपूर्ण रांग बुक करून आम्ही सर्व मित्र चित्रपट पहायचो. एकदा मला माझ्या काकांनी खांद्यावर बसवून मला थिएटरपर्यंत नेले हेाते. त्या ठिकाणी खुर्च्या नव्हत्या, त्यावेळी संपूर्ण चित्रपट मी काकांच्या खांद्यावर बसून बघितला होता. माधुरी दीक्षित माझी आवडती अभिनेत्री हेाती. हे घरीही माहिती होते, त्यामुळे १९९५ मध्ये युतीचे सरकार आल्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माधुरी दीक्षितशी माझी ओळख करून दिली होती. आता सिनेमागृहात जाणे होत नाही. मात्र, ओटीटी प्लटफॉर्मवर मी सिनेमे आणि सीरिज पाहतो. क्रिकेट खेळणे माझा आवडता छंद होता. अगदी विद्यापीठस्तरापर्यंत क्रिकेट खेळलो आहे. माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही हात उचलला नाही. मात्र, शाळेला न गेल्यामुळे आईने मला मारले आहे, अशी आठवणीही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com