Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

'त्या शेंगदाण्याचा आनंद फाईव्ह स्टारमधील ड्रायफूट खाल्ल्यासारखा झाला होता...'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यास २० वर्षांच्या संघर्षानंतर मिळाले घर

गडहिंग्लज : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्त्याचा घराचा वीस वर्षांपासूनचा लढा अखेर यशस्वी झाला. मी त्याच्या घरी भेट द्यावी, अशी त्याची इच्छा होती, त्यानुसार मी त्याच्या घरी गेलो. माझं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे मला आवडतात म्हणून देशी वाणाचे भाजलेले शेंगदाणे माझ्यासाठी बनवले होते. ते खाताना फाईव्ह स्टार हॉटेलमधील ड्रायफूट खाल्याचा आनंद मिळाला. तसेच, आपल्या एका आदेशावर जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यकर्त्याला हक्काचे घर मिळाल्याचे मोठे समाधान मला वाटत होते. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा आनंद फेसबुक पोस्ट लिहित शेअर केला आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana activist got a house after 20 years of struggle)

गडहिंग्लज तालुक्यातील जरळी या गावातील आप्पा पोटे या कार्यकर्त्याची ही गोष्ट आहे. जरळी हे शेतकरी चळवळीतील बालेकिल्ला असणारे गाव आहे. या गावातील कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे गडहिंग्लज तालुकाभर त्यांचा दरारा असायचा. सुमारे २० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आप्पा पोटे नावाचा एक गरीब तरुण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात उत्साहाने सहभागी असायचा.

Raju Shetti
राष्ट्रवादीबाबत पटोलेंची सोनिया गांधींकडे तक्रार... अजितदादा म्हणतात, ‘फार महत्व द्यायचं कारण नाही!’

पित्याचे छत्र हरपल्यामुळे आप्पा पोटे ‘जरळी’ या त्याच्या आजोळीच लहानाचा मोठा झाला. घरची गरीबी, आई व बहिणीची जबाबदारी यामुळे आप्पाची आर्थिक कुचंबना व्हायची. पण, चळवळीचे आकर्षण त्याला गप्प बसू देत नव्हते. राहायला साधे घरही नव्हते. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या मामाकडे आप्पा पोटे याला राहण्यापुरती दोन गुंठे जमीन देण्याची विनवणी केली. पण, मामा दाद द्यायला तयार नव्हता. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आप्पाच्या आईचा स्त्री धनाचा कायदेशीर हक्क सांगून आप्पाला ३० गुंठे जमिनीचा कायदेशीर मालक बनवला आणि जबरदस्तीने आप्पाला ताबाही घेऊन दिला.

Raju Shetti
बाबांनो, मी खूप अनुभवलंय...तोलून मापून बोला : अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

आप्पा पोटे हा बेघर असल्यामुळे पंतप्रधान घरकुल योजनेतून त्याला घरही बांधून दिले. आज आप्पा स्वतःच्या मालकीच्या टुमदार घरात आई व बहिणीसहित आनंदात राहतो. मी त्याच्या घरी भेट द्यावी, अशी त्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे राजेंद्र गड्यान्नावर, आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब भोसले यांच्यासह पोटे याच्या घरी गेलो. पोटे कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात माझे स्वागत केले. मला आवडतात म्हणून त्याने खास देशी वाणाचे भाजलेले शेंगदाणे माझ्यासमोर ठेवले, ते शेंगदाणे खात असताना पंचतारांकित हॉटेलमधील ड्रायफूट खाल्ल्याचा आनंद झाला. याशिवाय आपल्या एका आदेशावरून जीव धोक्यात घालून चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर छप्पर आल्याचं मनस्वी समाधान मला लाभलं, असे राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com