राष्ट्रवादीच्या कल्याणराव काळेंची पाऊले शिंदे गटाकडे?; कट्टर समर्थकाची सहसंपर्कप्रमुखपदी वर्णी

काळे यांचे कट्टर समर्थक आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे यांची शिंदे गटाकडून सोलापूरच्या सहसंपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
EKnath Shinde-Kalyanrao Kale
EKnath Shinde-Kalyanrao KaleSarkarnama

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पंढरपूरचे (Pandharpur) नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांची पाऊले सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडे पडताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची काळे यांनी पंढरपुरात भेट घेतली होती. त्यानंतर काळे यांचे कट्टर समर्थक आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे यांची शिंदे गटाकडून सोलापूरच्या (Solapur) सहसंपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते काळे शिंदे गटात प्रवेश करणार का, याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. (Supporter of Kalyanrao Kale has been selected as joint liaison chief of Shiv Sena (Shinde group)

पंढरपूर-मंगळेवढा पोटनिवडणुकीच्या तोंडावर कल्याणराव काळे यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आले हेाते. राष्ट्रवादीत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून त्यांच्या सहकारी शिरोमणी कारखान्यासाठी थकहमी देण्यात आली होती. त्यावेळी राज्य सरकारने मोजक्याच कारखान्यांना थकहमी दिली हेाती, त्यात काळे यांच्या कारखान्याचा समावेश होतो. त्यानंतर काळात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांचा पराभव झाला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे संयुक्त सरकार सत्तेवर आले.

EKnath Shinde-Kalyanrao Kale
पवारांचे निष्ठावंत बबनदादा, सोपल, राजन पाटलांचं नक्की काय ठरलंय!

राज्यातील सरकार बदलताच कल्याणराव काळे यांच्या भूमिकेतही बदल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मध्यंतरी तानाजी सावंत हे मंत्री झाल्यानंत प्रथमच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले हेाते. त्यावेळी काळे यांनी पंढरपुरात सावंत यांच्या पुतण्याच्या घरी आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून काळे यांचा कल शिंदे गटाकडे वाढल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली होती. त्यानंतरच्या घडामोडीत मात्र काळे यांचे खंदे समर्थक कवडे यांची शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुखपदी निवड झाली आहे.

EKnath Shinde-Kalyanrao Kale
शिवसेनेचे सहा नेते फोडून शिंदे गटाने केले आदित्य ठाकरेंचे रत्नागिरीत स्वागत; सभा सुरू असतानाच दिला दणका!

कवडे हे कल्याणराव काळेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शिवाय ते सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालकही आहेत. त्यांच्या निवडीने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काळे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चा असताना ते पुन्हा पक्ष बदलतात की काय अशी चर्चा सध्या रंगली आहे. काळे यांचा आतापर्यंत काँग्रेस, काँग्रेसमधून भाजप, भाजपतून शिवसेना आणि शिवसेनेतून भाजप, भाजपतून राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे साखर कारखानदारीसाठी काळे पुन्हा पक्षांतर करणार काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in