Subhash Desai News : देसाईंनी गिरावला खासदार किर्तीकरांचा कित्ता? ठाकरेंना पुन्हा धक्का : निष्ठावंतांची घर का फुटताहेत!

Shivsena News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Uddhav Thackeray, Subhash Desai
Uddhav Thackeray, Subhash DesaiSarkarnama

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरेंचे विश्वासू नेते, माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. खासदार गजानन किर्तीकर यांच्यानंतर सुभाष देसाई यांच्या घरातही फूट पडली आहे. या चर्चेनंतर, सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केली. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देण्यास देसाई यांनी नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

Uddhav Thackeray, Subhash Desai
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेतेपदी मुख्यमंत्री शिंदेंचे नाव; जयंत पाटील म्हणतात माझेही पद धोक्यात...

देसाई यांनी खासदार किर्तीकर यांचा कित्ता गिरवला असल्याचे बोलेल जात आहे. कारण, गजानन किर्तीकर शिंदे गटात आहेत. व त्याचे पुत्र अमोल किर्तीकर हे ठाकरे गटात आहेत. त्याच प्रमाणे आता सुभाष देसाई हे ठाकरे गटात आहेत आणि त्यांचे पुत्र भूषण देसाई हे शिंदे गटात आहेत.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई म्हणाले, ''एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रेरीत होऊन आपण हा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी आधीपासून काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत आवडल्यामुळे मी हा निर्णय घेतला. मी आज शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, हा माझा स्वतंत्र निर्णय आहे'', असे त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray, Subhash Desai
Old Pension : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही कर्मचारी संपावर ठाम; अधिकाऱ्यांनीही वाढवले सरकारचे टेन्शन

प्रवेशानंतर शिवसेनेत जबाबदारी काय असणार? या प्रश्नावर बोलताना ते भूषण देसाई म्हणाले, एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडणार आहे'' या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रातील हजारो पदाधिकारी आणि शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य शिवसेनेमध्ये येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com