विधान परिषदेला भाजप वेगळा डाव टाकणार : रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट!

विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीबाबत रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP) विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) विचारपूर्वक पाच उमेदवार दिले आहेत. बुद्धिबळाचे बादशहा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत हरवले आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही तोच खेळ खेळणार नाही. आता आम्ही वेगळा डाव टाकणार आहोत. कारण, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आमचा तो डाव माहित झाला आहे, त्यामुळे ते आता त्या रस्त्याने जाणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत आम्ही वेगळा मार्ग काढून भाजपचे सर्वच सर्व उमेदवार निवडून आणणार आहोत, असा गौप्यस्फोट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला. (Statement of Raosaheb Danve regarding the strategy of Legislative Council Election)

केंद्रीय राज्यमंत्री दानवे हे माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी वरील गोष्टींचा उलगडा केला. केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही वेगळ्या मार्गाने जाणार आणि आमचे पाचही उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देणार आहोत.

Raosaheb Danve
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

एकनाथ खडसे यांना पराभूत करण्यासाठी भारतीय पक्षाने रणनीती आखली आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, आम्ही एकनाथ खडसे यांनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांना हरवणार आहेात, आम्ही कोणत्याही व्यक्तीला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही.

Raosaheb Danve
अपक्षांवर आरोप करणाऱ्या राऊतांना शिवसेनेतील खदखद दिसेल का?

खडसे यांना उमेदवारी दिली नसती तर भाजपने ही निवडणूक बिनविरोध केली असती, असेही जलील यांनी म्हटले आहे. त्यावर रावसाहेब दानवे म्हणाले की, आमचा असा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीकडे गेलेला नाही. कारण, देवेंद्र फडणवीस आणि मी बुधवारी (ता. १५ जून) एकत्र होतो. आमची या विषयावर चर्चाही झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे, आम्ही कोणाचं नाव का बरं सुचवावे, असा प्रश्न दानवे यांनी केला.

Raosaheb Danve
भगिरथ भालकेंच्या अडचणीत वाढ : विठ्ठल परिवारात २० वर्षांनंतर फूट!

इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना नवीन पक्ष काढण्याबाबत दिलेल्या सल्ल्यावरही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, राजकारणात दुसऱ्यांमध्ये कसा खोडा घालता येईल, असे प्रत्येकजण पाहत असतो. जलील म्हटल्यावर पंकजा मुंडे त्यांना प्रतिसाद देतील, असे काही नाही. त्या पक्षाच्या प्रमुख नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे असं कोणाच्याही बोलण्यावर त्या निर्णय घेतील, असं मला वाटत नाही. पंकजा मुंडे या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य त्या ठिकाणी त्यांचा विचार करेल, अशी मला खात्री आहे, असे राज्यसभा व विधान परिषद या दोन्ही ठिकाणी त्यांचा विचार न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला, या प्रश्नावर दानवे यांनी उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com