बार्शीच्या `हर्षद मेहता` च्या करामती : `दहा लाख गुंतवा; वर्षात सहा कोटी हसत न्या!`

विशाल फटे (Vishal Phate) याच्या फसवणुकीमुळे अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ
Vishal Phate Barshi
Vishal Phate BarshiSarkarnama

बार्शी : बार्शी शहरातील `हर्षद मेहता` विशाल अंबादास फटे (Vishal Phate) याच्याविरुद्धचा फास पोलिसांनी आवळण्यास सुरवात केली असून त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली. फटे याने सध्या सहा कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे दिसत असले तरी हा आकडा मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. काहीच्या काही आश्वासने देऊन त्याने गंडा घातला आहे. पोलिसांनी त्याच्या भावाला आणि वडिलांना आज अटक केली. मात्र तो आणि त्याची पत्नी अद्याप फरार आहेत.

वैभव अंबादास फटे व अंबादास गणपती फटे अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अलका अंबादास फटे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. दीपक बाबासाहेब अंबारे यांनी फिर्याद दाखल केली होती ही घटना 2019 पासून 9 जानेवारी 2021 दरम्यान घडली.

Vishal Phate Barshi
PDCC : पुणे बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे

कसा घडला गुन्हा?

विशाल फटे याने स्थापन केलेल्या तीन कंपन्यांमधून व्यवहार करुन शेअर्स मार्केटमध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठ्या रकमा कपन्यांच्या खातेवर घेत असे गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवीत होता आरटीजीएस,धनादेशद्वारे तसेच रोखही रक्कम स्विकारत होता. बार्शी शहर व परिसरातील नागरिकांना ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दररोज दोन टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते आमिषाला बळी पडून नातेवाइकांकडून, हातउसने पैसे घेऊन विशाल फटे याच्या तीन कंपन्यांच्या खात्यामध्ये अनेकांनी गुंतवणूक केली होती. त्यातील पहिली तक्रार दीपक अंबारे यांनी दाखल केली आहे.

दीपक बाबासाहेब अंबारे (वय 37,बार्शी) यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास फटे हे बी. पी. सुलाखे काॅमर्स काॅलेज येथे प्राध्यापक होते त्यांचा मुलगा विशाल फटे याचे मोहिते काॅम्प्लेक्स शिवाजी काॅलेज रोड येथे नेट कॅफे होते. सन 2019 मध्ये माझी पीकविम्याच्या संदर्भात विशाल अंबादास फटेशी ओळख झाली. त्यानंतर वारंवार भेटीतून परस्पर मैत्रीचे जिव्हाळयाचे व विश्वासाचे संबंध झाले. त्यावेळी अलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून तो शेअर मार्केटमध्ये तो गुंतवणूक करत असल्याची माहिती मिळाली. शेअर मार्केटमधून मिळालेला फायदा तो आम्हाला दाखवित होता. त्याचा फायदा पाहून मी प्रथम 70 हजार रुपये गुंतविले होते. त्यातून त्याने मला ब-यापैकी फायदा करुन दिला. त्यामुळे माझा विश्वास बसला. विशाल फटे याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता विशालका कन्सल्टन्सी, अलका शेअर्स सर्विसेस, जे.एम. फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपन्या काढल्या होत्या. वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे तसेच आई अलका फटे यांच्या नावे त्याने त्या कंपन्या चालू केल्या होत्या. या कंपन्यामार्फत त्याने वेगवेगळया कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी बार्शी तसेच इतर भागातील नागरिकांकडून मोठया रक्कमा घेतल्या. या रकमा त्याने त्याच्या कंपन्यांच्या खात्यामध्ये घेतल्या. त्याकरीता गुंतवणूकदारांना तो आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवित होता. तो काही लोकांकडून आरटीजीएस किंवा चेकमार्फत वा रोख रक्कम घेत होता.

Vishal Phate Barshi
मुख्यमंत्र्याच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह लिखाण करणारा भाजपचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

फटे हा गुंतवणूकदारांची रक्कम ही `आयपीओ ग्रे मार्केट`मध्ये गुंतवणूक करीत असल्याचे सांगत होता. हे मार्केट महिन्यातून 2 ते 3 वेळा सुरू असते. त्यामध्ये 15 ते 20 टक्के नफा होत असतो. त्यामुळे महिन्यास गुंतवलेल्या रक्कमेवर अंदाजे 30 ते 35 टक्के नफा मिळत असल्याचे तो भासवत होता. शेअर मार्केटमध्ये `अल्गो ट्रेडिंग` ही नवीन संकल्पना त्याने तयार करुन या ट्रेडिंगबद्दल त्याचा भरपूर अभ्यास असल्याचा भासवून त्याने बार्शी शहरातील व परिसरातील इतर लोकांना रोज दोन टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे परिसरातील लोकांनी त्यावर विश्वास ठेवून मोठया प्रमाणात पैसे गुंतविले होते. मात्र हे बिंग लवकरच फुटले.

विशाल फटे यास दि. 27/11/2021 रोजी `झी हिंदुस्थान`च्या वतीने केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते बेस्ट टेक्नाॅलजी डेव्हलपमेंट इन अल्गो ट्रेडिंग इन इंडिया म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे ब-याच लोकांनी कोटयवधी रुपयांची रक्कम फटे याच्याकडे गुंतवली होती.

Vishal Phate Barshi
निवडणूक संपली की योगी आदित्यनाथ पाहणार कंगनाची भूमिका असलेला हा चित्रपट

एवढेच नाहीतर जे. एम. फायनान्स सर्व्हिसेस नावाची कंपनी तयार करुन त्याचे बनावट कागदपत्रे तयार करुन ते एचडीएफसी बॅंकेत त्या कंपनीचे खाते काढले होते. त्या खात्यावर म्हणजे जे. एम. फायनान्सच्या नावावर पैसे भरण्यास गुंतवणूकदारांना सांगितले होते. त्या अकौंंटवरही गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणात रकमा टाकल्या. परंतु ती कंपनी बनावट असल्याबाबत मूळ कंपनी असलेल्या जे. एम. फायनान्सच्या लक्षात आल्याने फटे याचे ते अकौंट बंद करण्यास भाग पाडले होते. तसेच फटे याने त्याचे मोबाईलवरुन 14 डिसेंबर 2021 रोजी व्हाॅटस ग्रुपवर एक संदेश टाकला होता. त्यात त्याने 10 लाख रुपये गुंतविल्यास वर्षभर न परतावा घेता वर्षाअखेरीस सहा कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी मर्यादित सभासद घेणार असल्याबाबतचेही सांगितले होते. एक पत्रकसुद्धा त्याने काढले होते. त्यामध्ये त्याने सदरची रक्कम ही रोख स्वरुपात स्विकारणार असल्याचे कळविले. त्यामध्ये किती लोकांनी सदर रक्कम भरली हे मला सांगता येणार नसल्याचे अंबरे यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारची रक्कम त्याचेकडे खुप मोठया प्रमाणात जमा झाली, असे फिर्यादित म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com