Solapur DCC : प्रशासक कोतमिरेंना थांबवा; बॅंकेच्या ५० कर्मचाऱ्यांचे सहकार आयुक्तांना साकडे

सहकार आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची नावे व भेटीची छायाचित्र इतरत्र जाऊ नयेत, या बद्दल कमालीची काळजी घेतली आहे.
Shailesh Kotmire-Solapur Dcc Bank
Shailesh Kotmire-Solapur Dcc BankSarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (District Bank) प्रशासक (Administrators) तथा राज्याच्या सहकार विभागाचे अतिरिक्त निबंधक शैलेश कोतमिरे यांनी सोलापूर डीसीसीचे प्रशासकपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्हा बॅंकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासक कोतमिरे यांनाच कायम ठेवा या मागणीसाठी आज (ता. १७ सप्टेंबर) जिल्हा बॅंकेतील ५० ते ५५ अधिकारी व कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने पुण्याला धाव घेतली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे (Anil Kavde) यांची भेट घेऊन या कर्मचाऱ्यांनी प्रशासक कोतमिरेंना सोलापूर डीसीसीमध्ये आणखी काही दिवस ठेवा, अशी मागणी केली. (Solapur DCC : 50 bank employees meet Cooperative Commissioner to stop the administrators Kotmire)

या शिष्टमंडळाने सहकार आयुक्त कवडे यांची आज दुपारी तीनच्या सुमारास भेट घेतली. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासक कोतमिरे यांचीही भेट पुण्यातील निवासस्थानी घेतल्याचे समजते. सहकार आयुक्तांच्या भेटीत नेमके काय घडले? डीसीसीचे प्रशासक म्हणून आणखी काही दिवस थांबण्यास कोतमिरे तयार झालेत का? याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Shailesh Kotmire-Solapur Dcc Bank
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; प्रदेशाध्यक्षपदासाठी या नेत्यांची नावे चर्चेत!

प्रशासक कोतमिरे यांना आणखी काही दिवस डीसीसीमध्ये ठेवण्यासाठी त्यांच्या जवळचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासूनच (ता. १७ सप्टेंबर) जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सहकार आयुक्तांच्या भेटीला जाण्यासाठी डीसीसीमधील ठराविकच अधिकारी व कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला होता. जिल्हा बॅंकेच्या मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह प्रत्येक तालुक्‍यातून मोजक्‍याच अन्‌ मर्जीतीलच व्यक्तींना पुणे भेटीचा निरोप देण्यात आल्याने जिल्हा बॅंकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर लागले आहे.

Shailesh Kotmire-Solapur Dcc Bank
मुख्यमंत्र्यांचा सावंत, शहाजीबापूंना ‘कोल्ड शॉक’; माढा, सांगोल्याची जबाबदारी दिली आपल्या खास व्यक्तीकडे

सहकार आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची नावे व भेटीची छायाचित्र इतरत्र जाऊ नयेत, या बद्दल कमालीची काळजी घेतली आहे. जवळपास साडेचार वर्षांपासून जिल्हा बॅंकेवर प्रशासक आहेत. येत्या काही महिन्यात बॅंकेवर संचालक मंडळ आल्यास आपले काय होणार? याची धास्ती शिष्टमंडळातील अनेकांना लागली होती.

आमदार राऊतांचे धारदार प्रश्‍न

बार्शीतील आर्यन शुगरकडे ३६० कोटी रुपयांची थकबाकी असताना ६८ कोटींना हा कारखाना विकला. बाकीचे पैसे कसे वसूल करणार?, आर्यन कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाची एफआरपी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एफआरपीची थकित रक्कम कोण देणार? जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या आरआरसी कारवाईतून ही रक्कम मिळणार की डीसीसी बॅंक ही रक्कम देणार?, हा कारखाना बीड राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांनी विकत घेतला असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या एफआरपी रक्कम देणार का? असे अनेक प्रश्‍न आमदार राऊत यांनी आर्यन शुगर व डीसीसीच्या कारभाराबद्दल उपस्थित केल्याने त्यांच्या प्रश्‍नांची धार आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात आणि डीसीसीच्या राजकारणात अधिकच वाढत राहण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com