Gokul Meeting : आमचे माईक बंद केले, आम्हाला बोलू दिले नाही, असे आरोप करत शौमिका महाडिकांचा सभात्याग

गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक बाहेर पडल्या आहेत.
Shoumika Mahadik
Shoumika MahadikSarkarnama

कोल्हापूर : आमचे माईक बंद करण्यात आलेले आहेत. आम्हाला बोलूही दिले जात नाही. आम्हाला आणि आमच्या ठरावधारकांना बसायला जागाही नाही. विरोधकांचा असाच आवाज दाबायचा होता तर कशाला बोलावली गोकुळची (Gokul) वार्षिक सभा बोलावली, असा सवाल करत महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक ((Shoumika Mahadik) आणि त्यांच्या संचालकांनी गोकुळच्या वार्षिक सभेवर बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. (Shoumika Mahadik walked out of Gokul's Annual meeting)

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाची (गोकुळ) सर्वसाधारण सभा आज (ता. २९ ऑगस्ट) आयोजित करण्यात आली होती. सभेला प्रचंड गर्दी झाली आहे. सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बसण्याच्या खुर्च्यावरून जुंपली होती. आमच्या ठरावधारकाला बसायला जागा नसेल तर मीही व्यासापीठावर जाणार नाही, मीही उभी राहूनच प्रश्न विचारेन, अशी भूमिका महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक यांनी घेतली होती. दुपारी दोनपर्यंत त्यांनी उभे राहूनच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. मात्र, माईक बंद आहेत, आम्हाला बोलू दिले जात नाही, असे सांगून त्यांनी सभात्याग केला.

Shoumika Mahadik
Gokul Annual Meeting : गोकुळच्या वार्षिक सभेला गोंधळातच सुरुवात; शौमिका महाडिकांनी घेतली ही भूमिका

वार्षिक अहवाल मंजूर करू नका, त्यावर आमचे प्रश्न आहेत. त्यावरील उत्तरे आम्हाला हवी आहेत. आम्हाला अधिकाऱ्यांकडून अहवालाचे वाचन ऐकायचे नाहीत. सत्ताधारी मंडळींनी मंजूर केलेले ठराव आम्हाला मंजूर नाहीत. आमचे सभासद शेतकरी हे गरीब आणि साधे आहेत. त्यांना अधिकाऱ्यांची आकड्यांची भाषा समजत नाही. बोलू दिले जात नाही, असे सांगून शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या वार्षिक सभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Shoumika Mahadik
पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर; रोहिणी खडसेंप्रमाणे पाऊल उचलण्याचे आवाहन

सत्ताधारी मंडळी हातवारे करून विषय मंजूर करा, असे सांगत होते. आमच्या संचालकांना बोलू दिले जात नव्हते. तेथे सर्वसामान्य सभासदांचे काय होत असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी मंडळींनी दिलेल्या आकडेवारी पर्दाफाश करण्यात येईल, असेही शौमिका महाडिक यांनी सांगितले.

Shoumika Mahadik
‘मोदींनी मला सांगितलं होतं, गुलाब, महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज’

कोल्हापूर माजी पालकमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, ऋतूराज पाटील, महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला कोल्हापुरात सुरुवात झाली. गोकुळचे अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या सभा होत आहे. अपेक्षेप्रमाणे गोकुळच्या या वार्षिक सभेला प्रचंड गर्दी झाली आहे. या पूर्वी सभेत खुर्च्याची फेकाफेकी, बाटल्या फेकून मारणे, असे प्रकार घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान, आम्ही येण्याअगोदरच्या आमच्या जागेवर कोण येऊन बसले आहे, याची चौकशी करा. आमच्या ठरावधारकांना बसायला जागा मिळत नसेल तर मीही व्यासापीठावर जाऊन बसणार नाही. आम्हाला आमची जागा मिळाली पाहिजे, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केली होती. आमचे प्रश्न तिखट स्वरुपाचे आणि सत्ताधारी पक्षांना झोंबणारे होते, त्यामुळेच आमचे माईक बंद ठेवण्यात आले हेाते, असा आरोपही शौमिका महाडिक यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in