शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची कृपाल तुमानेंच्या घरी बैठक झाली...? तुमाने स्पष्टच म्हणाले...

आम्हा सर्व शिवसैनिकांना एकच वाटतं की बाळासाहेबांची शिवसेना एकसंघ व्हायला पाहिजे.
Krupal Tumane
Krupal TumaneSarkarnama

मुंबई : ‘‘शिवसेनेच्या (shivsena) नाराज दहा खासदारांची दिल्लीतील माझ्या घरी कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या सहा दिवसांपासून मी नागपूरमध्ये आहे, त्यामुळे मीच नागपूरमध्ये असेन तर माझ्या दिल्लीतील घरी बैठक कशी होईल. दुसरी गोष्ट अशी की, शिवसेनेच्या खासदारांपैकी सहा जण हे वारीला गेले आहेत. तीन खासदार मुंबईत होते, तर उर्वरीत आपापल्या मतदारसंघात होते, त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही बैठक होण्याचा प्रश्नच येत नाही,’’ असे शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी स्पष्ट केले. (Shiv Sena's 10 disgruntled MP meeting at Krupal Tumane's house ...? Tumane said...)

Krupal Tumane
प्रसाद सावंतांना मिळाले निष्ठेचे फळ : ठाकरेंनी सोपवली माथेरानची जबाबदारी!

शिवसेनेच्या नाराज दहा खासदारांची दिल्लीत रामटेकचे पक्षाचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घरी बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, त्यावर बोलताना तुमाने यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, आम्हा सर्व शिवसैनिकांना एकच वाटतं की बाळासाहेबांची शिवसेना एकसंघ व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार तसेच उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसायला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये समेट घडावा, यासाठी खासदारही प्रयत्नशील आहेत. सर्वांनी एकत्र येऊन शिवसेना पक्ष राज्यात एक नंबरचा बनावावा, अशी आम्हा सर्वांची अपेक्षा आहे.

Krupal Tumane
'पांडुरंगानं माझं म्हणणं ऐकलं; आमचा मुख्यमंत्री आषाढीला पूजेला येतोय!'

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. पण त्यापूर्वी त्यांच्याकडे एसी आणि एसटी असोसिएशनचे लोक पाठिंब्यासाठी गेले होते. त्यानुसार ते पत्र शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केले आहे. तसेच, आम्ही खासदारांनीही राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील आपापली मते उद्धव ठाकरेंकडे नोंदविली आहेत. त्याबाबतचा निर्णय ठाकरे लवकरच जाहीर करणार आहेत, असेही तुमाने यांनी स्पष्ट केले.

Krupal Tumane
आढळरावांना पुण्यातून लढविण्यास जिल्हाप्रमुखांसह शिवसैनिकांचा विरोध

बंडखोर आमदारांचं म्हणणं होतं की आमचं कोणी ऐकून घेत नाही. खासदारांचं काय म्हणणं आहे. त्यावर तुमाने म्हणाले की, आम्ही खासदार जास्तीत जास्त दिवस दिल्लीत असतो. सुमारे सव्वाशे ते दिडशे दिवस संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी असतो. त्याशिवाय वेगवेगळ्या कमिटीच्या बैठका असतात. मुंबईत आमची कामे कमी असतात. असतील तर ती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मार्गी लावतो, त्यामुळे मला कधी तसं वाटलं नाही, असेही खासदार तुमाने यांनी नमूद केले.

Krupal Tumane
पावसातील सभा समाधान आवताडेंना विजयापर्यंत नेणार का?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी आता एकत्र यायला हवं. आम्हा खासदारांसह सर्वसामान्य शिवसैनिकांची तीच इच्छा आहे, असेही खासदार तुमाने यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com