शिवसेनेच्या आठ मंत्र्यांची हकालपट्टी?

राज्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल आठ मंत्री मागील पाच दिवसांपासून राज्याबाहेर आहेत.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath Shindesarkarnama

सोलापूर : आम्ही (स्व.) बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरूध्द बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे (shivsena) ४१ आणि चार-पाच अपक्ष आमदार आपल्यासोबत असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. विशेष बाब म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल आठ मंत्री मागील पाच दिवसांपासून राज्याबाहेर आहेत. पक्षाने टप्याटप्याने बंडखोर आमदारांना पक्षातून निलंबीत करण्याची कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेल्यांची मंत्रीपदे जाणार, हे निश्चित मानले जात आहे. (Shiv Sena will expel eight rebel ministers)

Uddhav Thackeray-Eknath Shinde
‘तानाजी सावंत कळीचे नारद, ते शिवसैनिक नाहीत’ : शिवसैनिकांनी पुण्यातील कार्यालय फोडले

भाजपशी फारकत घेत शिवसेनेने २०१९ मध्ये परंपरागत विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, असे भाष्य केले असतानाच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात मुलगा आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री झाले. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार तानाजी सावंत यांनी थयथयाट करत ‘पुन्हा ‘मातोश्री’ची पायरी चढणार नाही,’ असे उद्‌गार थेट पक्षप्रमुखांसमोर काढले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचे संकट आले. पण यंदाच्या (२०२२-२३) अर्थसंकल्पात मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला मोठा निधी मिळेल, असा विश्वास सर्वांना होता. पण, सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आणि तेथूनच आघाडीत धुसपूस सुरु झाली. या निधी पळवापळवीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनकाळात भाष्य करत आगीत तेल ओतण्याचे काम केले होते.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
शिवसेना अन्‌ बाळासाहेब ठाकरेंचे नाव कोणालाही वापरता येणार नाही : राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव

दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनीही काही नेत्यांच्या मागे तपास, चौकशीचा ससेमिरा सुरु केला. अनेक मतदारसंघात भाजपच्या तुलनेत शिवसेना आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीचेच आव्हान आहे. या व्यथा मांडण्यासाठी मंत्री, आमदारांसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुखांची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत गेली. मंत्री असूनही काहींची कामे होत नव्हती, त्यांना दुसऱ्या विभागाच्या मंत्र्यांकडे हात जोडावे लागत होते. दरम्यानच्या काळात झालेल्या राज्यसभा, विधान परिषदेत संख्याबळ नसतानाही भाजपनेच बाजी मारली. यामागे ही खदखदच होती, हे लक्षात येऊनही पक्षनेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केले. या सर्व बाबींचा विचार करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ५६ पैकी ४१ आमदारांनी पक्षाविरूध्द बंडाचे निशाण फडकावले. आता त्या आमदार-मंत्र्यांविरूध्द पक्षाने कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे त्या आठ मंत्र्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडून तूर्त अभय; नेतेपदी कायम!

यांची मंत्रीपदे धोक्यात

एकनाथ शिंदे (नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री), गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री), दादा भुसे (कृषी मंत्री), संदीपान भूमरे (रोहयो व फलोत्पादन मंत्री), बच्चू कडू (जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री), अब्दुल सत्तार (महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री) व शंभूराज देसाई (गृह राज्यमंत्री), राजेंद्र पाटील-यड्रावकर (आरोग्य राज्यमंत्री) हे कॅबिनेट व राज्यमंत्री पक्षाविरूध्द बंडखोरी करून परराज्यात गेले आहेत.

बंडखोरांमधील खदखद अन्‌ आरोप

 • शिवसेनेमुळे सत्तेत येऊनही काँग्रेस-राष्ट्रवादीने अन्यायच केला

 • मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपविण्याचा कट

 • काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जनताभिमुख व सर्वाधिक निधीची खाती

 • मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही ज्यांना कायम विरोध केला, त्यांच्याशीच जुळवून घेण्याची वेळ

 • सत्ता असूनही शिवसेनेची वाढ होत नसल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज

 • बाळासाहेबांचे भाजपसोबत अनेकदा मतभेद होऊनही त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली नाही.

ठळक बाबी...

 • शिवसेनेतून निवडून आलेल्या ५६ पैकी जवळपास ४१ आमदार एकनाथ शिंदेंसोबत

 • गटस्थापनेसाठी शिंदेंकडे पुरेसे संख्याबळ; गटाची मान्यता कायद्याच्या कचाट्यात

 • विधानसभा उपाध्यक्षांनी पाठविलेल्या निलंबनाच्या नोटिसीनंतर शिंदेंचा उपाध्यक्षांवरच पलटवार

 • १६ आमदारांना निलंबनाची नोटीस; विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा शिंदे गटाचा प्रस्ताव

 • बंडखोर आमदारांमध्ये एकनाथ शिंदेंसह सात मंत्री; पक्षप्रमुख करणार मंत्र्यांची हकालपट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in