Manisha Kayande News : शिवसेनेच्या मनीषा कायंदेंनी केला नारायण राणेंचा 'करेक्ट कार्यक्रम'

Manisha Kayande News : मनीषा कायंदे सरकारनामाच्या ओपन माईक कार्यक्रम सीजन 2 कार्यक्रमात बोलत होत्या
Manisha Kayande News
Manisha Kayande NewsSarkarnama

Manisha Kayande News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे एक कल्ली कार्यक्रम आहे. तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे, अशा शब्दांत आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला.

मनीषा कायंदे 'सरकारनामा ओपन माईक सिजन - 2' कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या दिपाली सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), उपस्थित होते.

Manisha Kayande News
देशपांडेंनी केली कायंदेंची कोंडी, भातखळकरांचे टोले, मिटकरी-तांबेंचे चिमटे अन् दीपाली सय्यदांचा अनोखा अंदाज

या कार्यक्रमात नेत्यांनी एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली आणि हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच चिमटेही काढले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन नेते या कार्यक्रमात रंगून गेले.

कार्यक्रमामध्ये तीन राऊंड होते, पहिल्या राऊंड होता, 'काढा डिटेक्टर' यामध्ये नेत्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. दुसरा राऊंड होता 'ईडी' म्हणजेच 'इकडचा डॉन', या राऊंडमध्ये नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारायचे होते. तीसरा राऊंड 'करेक्ट कार्यक्रम' होता. यामध्ये उपस्थितांना काही कार्ड देण्यात आले होते. त्यामध्ये एक कार्ड त्यांनी निवडायचे होते. त्यावर फोटो असलेल्या नेत्याला ट्रोल करायचे होते. यामध्ये शिवसेनेच्या कायंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

Manisha Kayande News
ठाकरेंकडे १५-१६च आमदार; संधी मिळाली तर शिवसेना सोडणार का? कायदेंनी स्पष्टच सांगितले

मनीषा कायंदे म्हणाल्या, नारायण राणे (Narayan Rane) केंद्रात लघु शुक्ष्म, मध्यम, मंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प आणले पाहिजेत. निदान कुकुट पालन तरी वाढावे, त्यांच्याकडे नियमीत एक कल्ली कार्यक्रम असतो, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे. केंद्रात मंत्रीपद मिळाले त्यामुळे राज्यातील ढवळाढवळ करुन भाजपला अडचणीत आणू नये, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांचा एक पक्ष होता. तो आता विसर्जीत झाला आहे. आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या अंगणात असलेली दोन धोतऱ्याची फुले आहेत, ती त्यांनी सांबाळावी. ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाची वाटच लागली. त्यामुळे आम्ही भाजपला शुभेच्छा देतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com