शिवसेनेचा बैठकांचा तडाखा अन् पवारांना सांगावा

राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेने (Shivsena) संजय पवार यांचे नाव फायनल केले आहे.
CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News
CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनाभवनमध्ये सोमवारी दिवसभर नेत्यांच्या बैठकांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) नाराज होऊन शिवसेनेत (Shivsena) आले नाहीत तर त्याची विशेषतः कोल्हापूरात (Kolhapur) भरपाई कशी करायची यावर खल सुरु होता. या बैठकांमध्ये शिवसैनिकच उमेदवार द्यायचा, जो मराठा पण असेल आणि कोल्हापुरातलाही असेल यावर एकमत झाले होते. (CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News)

शिवसेनेत ३० वर्षे असणारे आणि शिवसेना वाढविण्यात मोठे योगदान असणाऱ्या संजय पवार या शिवसैनिकाला उमेदवारी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र, पवार यांचे नाव चर्चेत आल्यानंतर संभाजीराजेंनी घाईघाईत सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. उद्धवजींचे आणि आमचे ठरले, अशी मोजकी प्रतिक्रिया देत त्यांनी सस्पेन्स वाढविला होता.

CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News
शिवसेना पडली बाजूला अन् मराठा संघटनांच्या हिट लिस्टवर आले संजय राऊत!

मात्र, तोपर्यंत शिवसेनेने आपला पुढचा प्लॅन आखला होता. संजय पवार यांना सकाळीच मुंबईला येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सकाळीच संजय पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले ते दुपारी ३ वाजता मुंबईत पोहोचले. शिवालय इथे जाऊन त्यांनी खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली. संजय पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन आले होते. देसाई यांनी कागदपत्रे तपासून काही सूचनाही त्यांना केल्या.

संजय राऊतांनी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केल्यावर पवार यांनी देखील माध्यमांना मोठ्या आनंदात प्रतिक्रिया दिली. इकडे तोपर्यंत संभाजीराजे मुंबईत दाखल झाले होते. संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटणार, अशा बातम्या येत होत्या. मात्र, पत्रकारांशी बोलताना संभाजीराजें यांनी भेट घेणार नसल्याचे स्पष्ट करत अजूनही शिवसेनेकडून मला अपेक्षा आहे, अशी आशा बोलून दाखविली.

CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News
उमेदवारी अन् छत्रपतींच्या सन्मानाचा संबंध नाही! मुनगुंटीवारांच्या गुगलीनं चर्चेला उधाण

संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यास अडचण असेल तर त्यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार कसे करता येईल यासाठी एक ड्राफ्ट तयार झाला होता. शिवसेनेने ते मान्य केले होते. आजही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शब्द फिरविता कामा नये, असे छावा संघटनेने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com