Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

Jalgaon District Bank : शिवसेना, काँग्रेसने आमचा विश्वासघात केला : जळगाव जिल्हा बॅंकेतील पराभवानंतर खडसेंचा आरोप

शिवसेनेकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती.

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आम्हाला शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने आमचा विश्वासघात केला, त्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आमच्याशी धोका झाला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पराभवाचे खापर या दोन्ही पक्षावर फोडले. (Shiv Sena, Congress betrayed us: Khadse's allegation after defeat in Jalgaon District Bank)

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा एका मताने पराभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे एका मताने निवडून आले आहेत. त्यांना शिवसेनेचे शिंदे गट, ठाकरे गट, भाजप आणि खडसेंच्या आरोपानंतर काँग्रेसनेही समर्थन दिल्याचे उघड झाले आहे. या पराभवानंतर खडसे बोलत होते.

Eknath Khadse
Jalgaon District Bank Election : नगरनंतर जळगावातही राष्ट्रवादीला धक्का : जिल्हा बॅंक निवडणुकीत अधिकृत उमेदवाराचा पराभव

खडसे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली. राष्ट्रवादीची दहा मते कायम राहिली आहेत, राष्ट्रवादीचं एक मत संजय पवार यांच्या माध्यमातून फुटलं आहे, त्यांनी बंडखोरी केली, आमच्याशी गद्दारी केली.

Eknath Khadse
NCP News : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने घेतली केसीआरची भेट; BRSमध्ये जाण्याबाबत मात्र मौन

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लढवायला कोणीही तयार नव्हतं, अशी मधल्या कालखंडातील परिस्थिती होती. पण, सर्वांच्या मदतीने मी स्वतः पुढाकार घेऊन या सर्वांसाठी जिवाचे रान करून जळगाव जिल्हा सहकारी बॅंक आमच्या ताब्यात आणली होती, त्यामुळे शिवसेनेकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती की, त्यांनी संजय पवार यांना समर्थन द्यावं, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला

Eknath Khadse
Jalgaon District Bank : खडसेंना धक्का; जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी बंडखोर संजय पवार विजयी

खडसे म्हणाले की, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेनेही बंडखोर उमेदवार संजय पवार यांना समर्थन दिले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून आम्हाला अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने आमचा विश्वासघात केला. त्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आमच्याशी धोका झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com