'चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये केलेल्या दगाफटक्याचा शिवसैनिकांनी बदला घेतला'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन प्रचारसभेत ‘आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्वाला नाही’ असे म्हटले होते. त्यामुळे मतदार बऱ्याच अंशी आमच्याबरोबर राहिला.
'चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये केलेल्या दगाफटक्याचा शिवसैनिकांनी बदला घेतला'
Chandrakant Patil-Rajesh KshirsagarSarkarnama

कोल्हापूर : शिवसैनिक हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे शिवसैनिक भाजपबरोबर (BJP) राहील, असा कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा अजेंडा होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऑनलाईन प्रचारसभेत ‘आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्वाला नाही’ असे म्हटले होते. त्यामुळे मतदार बऱ्याच अंशी आमच्याबरोबर राहिला. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची (shivsena) युती असताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसून भाजपचे सर्व मतदान काँग्रेसकडे वळविले होते. शिवसैनिकांनी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्याचा बदला घेतला आहे, अशी भावना कोल्हापूर उत्तरमधील जयश्री जाधव यांच्या विजयानंतर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी बोलून दाखवली. (Shiv Sainiks take revenge for Chandrakant Patil's 'that act' in 2019 : Rajesh Kshirsagar)

राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचा आदेश शिवसैनिक तंतोतंत पाळतो. शिवसैनिक निष्ठावंत आणि प्रमाणिकच आहे, हे कोल्हापूरच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा मतदारसंघ; पण महाआघाडीच्या समीकरणामुळे तो काँग्रेसला सोडावा लागला. पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मला आदेश दिला. त्या आदेशाप्रमाणे मी या निवडणुकीत ‘मी स्वतः उमेदवार असल्यासारखा प्रचार केला.’ शिवसैनिकांना समजून सांगण्यास थोड वेळ गेला, उशीर झाला. पण, राज्यातील एक ना एक शिवसैनिक हा महाविकास आघाडीचा समर्थक आहे. सर्व मतदान महाआघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना झाले आहे. राज्यातील जनतेने महाआघाडीला कौल दिलेला आहे, तो पाहून महाआघाडी भक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे विरोधकांनी आमच्या पक्षप्रमुखांना वेगवेगळ्या मार्गांनी त्रास देण्याचे काम सुरू केलेले आहे, ते आता थांबवावे.

Chandrakant Patil-Rajesh Kshirsagar
शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग : शिवचरित्र अभ्यासकाचा आरोप

कोल्हापूरमध्ये सहा मे १९८६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हापासनच शिवसेनेला मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे. आमदार असताना आणि नसतानाही १२ वर्षांच्या कालावधीत मी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत, त्यामुळे येथील मतदार मला सोडून जाऊ शकत नाही. पक्षप्रमुखांचा जो आदेश आला, तोच मी या मतदारसंघातील मतदारांना दिला आहे. आगामी काळातही कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहील, असा दावा क्षीरसागर यांनी केला आहे.

Chandrakant Patil-Rajesh Kshirsagar
इंदापूरकरांनी घरी बसवलेले कोल्हापुरात भाजपच्या प्रचाराला गेले होते : भरणेंचा पाटलांना टोमणा

ते म्हणाले की, भाजपचं कसलं हिंदुत्व. हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये एकत्र लढलो. आमच्या विरोधात काँग्रेस होती, त्यावेळी भाजपला हिंदुत्व दिसलं नाही का? माझ्या पाठीत वार केला आणि काँग्रेसला मदत केली. भाजपवाल्याचं हिंदुत्व म्हणजे सत्तेच्या लालसेपोटीचं बेगडी हिंदुत्व आहे. काश्मीरमध्ये जाऊन सत्तेसाठी ‘पीडीपी’बरोबर युती करतात. हे काय हिंदुत्व आहे, याचा भाजपने गांभीयाने विचार करावा. सत्तेसाठी काहीही करून चालणार नाही. महाराष्ट्र भक्कम असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जाणारा आहे, त्यामुळे भाजपने जातीपातीचे राजकारण सोडून विकासाच्या मुद्यावर आले पाहिजे.

Chandrakant Patil-Rajesh Kshirsagar
सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्यास ११ लाखांचे, तर बांगड्या भरणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस!

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप हद्दपार केला आहे, याचा त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा. तसेच, ते काहीही बोलत असतात. हिमालयात जाईन, असेही ते म्हणाले होते, त्याचा त्यांनी आता विचार करावा, असे आवाहन करून क्षीरसागर यांनी कोल्हापूरमधील विजयाचे श्रेय मी घेणार नाही. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी जयश्री जाधव यांच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे, त्यामुळे या विजयाचे श्रेय घेणे मला योग्य वाटत नाही, ते कोणाचे श्रेय आहे, हे जनता ठरवेल, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.