Shinde Vs Thackeray : शिंदे गट आणखी एक नवा डाव टाकण्याच्या तयारीत; ठाकरेंच्या उत्तराकडे असणार महाराष्ट्राचे लक्ष

शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे १५ आमदार उपस्थित राहण्याची शक्यता तशी कमीच आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण ताब्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या गटाकडून आक्रमक रणनीती आखण्यात येत आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी व्हीप बजावून बैठक बोलावून त्यात ठाकरे गटातील (Uddhav Thackeray) १५ आमदारांना अडकविण्याचा डाव आखला जात आहे. व्हीप बजावून बैठक बोलविण्यासंदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गट आपले आमदार वाचविण्यासाठी काय उपाय योजना करतो, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. (Shinde group will trouble the MLAs of the Thackeray group)

दरम्यान, शिवसेनेवर दावा कोणाचा, याबाबत अद्यापही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी जोपर्यंत याबाबतची सुनावणी पूर्ण होऊन निकाल दिला जात नाही, तोपर्यंत ठाकरे गट आणि शिंदे गट परस्परांना व्हीप जारी करू शकत नाहीत, असे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shiv Sena Vs BJP : ‘शिवसेना, धनुष्यबाणासाठी दोन हजार कोटींचा सौदा’ : राऊतांच्या दाव्यावर भाजपने दिले हे उत्तर...

येत्या २७ फेब्रुवारीपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी व्हीप बजावून बैठक बोलवणार असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे १५ आमदार उपस्थित राहण्याची शक्यता तशी कमीच आहे. हे आमदार बैठकीला हजर न राहिल्यास त्यांना नोटीस बजावून विधानसभा अध्यक्षांच्या मार्फत त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सध्या केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Ambegaon News : आंबेगावात आता विकासासाठी डबल इंजिन : वळसे पाटलांच्या कोटीला आढळरावांची हसून दाद

येत्या विधिमंडळ अधिवेशनात आदित्य ठाकरे यांच्यासह या सर्व १५ आमदारांना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप पाळावा लागणार आहे. तसेच, मांडलेल्या विधेयकांवर त्यांच्या बाजूने मतदानही करावे लागणार आहे. ठाकरे गटाने आदेश पाळला नाही, तर आदित्य यांच्यासह उर्वरीत १५ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shah On Patil : ‘ये हर्षवर्धन मेरा सर खा जाता है हमेशा’ : ‘इथेनॉल’ फायनान्ससाठी लढणाऱ्या पाटलांचा शहांकडून भाषणात उल्लेख

आम्ही फक्त ठाकरे नावाने दिलेला व्हीप मानतो : देशमुख

आम्ही पण फक्त ठाकरे नावाने दिलेलाच व्हीप मानतो. शिवसैनिक आणि मतदार कधीच चिन्हाबरोबर नसतो. पक्षाच्या नेतृत्वाबरोबर असतात. शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आहेत. हिंदुत्ववादी, मराठी विचारांचा मतदार ठाकरेंबरोबर आहे, चिन्हाबरोबर नाही, असे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
MAHA CONCLAVE : नवी सहकार नीती बनविण्यासाठी सुरेश प्रभूंच्या नेतृत्वाखाली समिती : अमित शहांची घोषणा

विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची : कळसे

विधीमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे याबाबत म्हणाले की, ठाकरे गटाला मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचा व्हीप लागू होऊ शकतो की नाही, हे विधानसभा अध्यक्षच ठरवतील. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली तर ठाकरे गट न्यायालयात दाद मागू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com