पारकरांनी ओळख करून देताच राज माझ्या मागावर : शर्मिला ठाकरेंनी सांगितला तो किस्सा!

सर्वात महागडी वस्तू बाळासाहेबांनी शर्मिल ठाकरे (Sharmila Thackeray) यांच्या वडिलांसाठी आणली होती.
Raj Thackeray, Sharmila Thackeray
Raj Thackeray, Sharmila Thackeraysarkarnama

मुंबई : लग्नाच्या आधीपासूनच राज यांचा स्वभाव मला माहित होता, त्यामुळे मला त्यांची भीती वाटली नाही, असे शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी सांगितले. परळला मैत्रिणीकडे गेले असताना, त्यावेळी राज ठाकरे तिकडे त्यांच्या मित्रांबरोबर आले होते. त्यावेळी राज यांचे मित्र शिरीष पारकर यांनी राज यांच्याशी ओळख करुन दिली, तेव्हापासून राज माझ्या मागावर होते, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे यांनी एका वृत्त वाहिनीशी संवास साधला, त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी राज यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या, शिवसेनेत (Shivsena) असताना देखील राज ठाकरे हे आक्रमक होते. मला त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच माहित होता. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडिल हे शर्मिला ठाकरे यांच्या वडिलांचे खास मित्र होते, त्यामुळे आमच्या लग्नाला विरोध झाला नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Raj Thackeray, Sharmila Thackeray
मुख्यमंत्र्यांना हिजडा म्हणणे शोभते का? : राणा दांपत्याच्या जामिनाला कडाडून विरोध

ज्यावेळी बाळासाहेब अमेरिकेला गेले होते. तेव्हा त्यांनी अनेक लोकांसाठी भेट वस्तू आणल्या होत्या. मात्र, सर्वात महागडी वस्तू बाळासाहेबांनी शर्मिल ठाकरे यांच्या वडिलांसाठी आणली होती, अशी आठवही राज यांनी सांगितली. बाळासाहेबांनी दोन कॅमेरे घेतले होते, एक उद्धव ठाकरे यांच्यासाठी तर दुसरा शर्मिला यांच्या वडिलांसाठी. शर्मिला यांच्या वडिलांसाठी घेतलेला हॅसलब्लॅड कॅमेरा महागडा होता, असे राज यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी शर्मिला आणि माझी ओळख नव्हती, असे राज म्हणाले.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, राज ठाकरे यांची बहिण माझी मैत्रीण होती. माझे वडिल ज्यावेळी पार्ट्यांना जात होते, त्यावेळी ते आम्हाला घेऊन जात असत. त्यामुळे राज यांच्या बहिणीची ओळख झाली होती, असे शर्मिला यांनी सांगितले.

त्याच बरोबर यावेळी राज ठाकरे म्हणाले, मी लवकर आजोबा झालो याचा आनंद आहे. आता मुलांना खेळवता येईल, असे राज म्हणाले. अमित ठाकरे ज्यावेळी लहान होते, त्यावेळी मी सतत बाहेर असायचो. नियमीत दौरे चालू असायचे, मी सतत फिरतीवरती असायचो. मी एकदा दैऱ्यावरुन घरी आलो. त्यावेळी अमितला कडेवर घेतले. तेव्हा शर्मिला यांनी अमितला बाबा कुठे आहेत, असे विचारायला सांगितले होते. त्यावेळी अमित यांनी भिंतीवर लावलेल्या फोटोकडे बोट केल्याचे राज यांनी सांगितले.

Raj Thackeray, Sharmila Thackeray
राज ठाकरेंच्या ताफ्याला दुसऱ्यांदा अपघात; पुणे शहराध्यक्ष बाबरांच्या गाडीचा समावेश

मुलांना जास्त वेळ देता आला नाही मात्र, आता नातवंडाना वेळ देता येतो असेही त्यांनी सांगितले. ज्यावेळी अमितला मुलगा झाल्याचे समजले त्यावेळी खूप आनंद झाला. मला समजल्यानंतर मी मोठ्याने किंचाळले होते, असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या. अमितला बाळ झाल्याचा सर्वात जास्त आनंद आहे. आज्जी आजोबा होण्यासारखे सुख कशातच नाही, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com