Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीवर परिणाम होणार?; सर्वेक्षण अहवाल काय सांगतो?

Sakal-Saam Survey : 'सकाळ-साम'च्या सर्वेक्षणात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग
Sakal-Saam Survey on Sharad Pawar Resignation Decision
Sakal-Saam Survey on Sharad Pawar Resignation DecisionSarkarnama

Sakal-Saam Survey on Sharad Pawar Retirement : शरद पवार यांनी मंगळवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तसेच राज्यसभेची टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पवारांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Sakal-Saam Survey on Sharad Pawar Resignation Decision
NCP News : अध्यक्षपदाचा पेच? राष्ट्रवादी काँग्रेसची घटना नेमकं काय सांगते?

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला आहे. यात सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या ७३.४ टक्के समर्थकांना पवारांनी पद सोडू नये असे सांगितले. तर सर्वपक्षीय ४७.५ टक्के लोकांनी पवारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे मत व्यक्त केले. तसेच ४५.९ टक्के लोकांनी त्यांचा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच इतरांनी काही सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.

Sakal-Saam Survey on Sharad Pawar Resignation Decision
Pune District Bazar Samiti : राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्हा जिंकला; पण शहर गमावलं

दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे (MVA) सरकार स्थापन करण्यात शरद पवारांची मोठी भूमिका होती. त्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने या महाविकास आघाडीवर काय परिणाम होऊ शकतो, असाही प्रश्न 'सकाळ-साम'च्या या सर्वेक्षणातून विचारण्यात आला होता. त्यावर सहभागी लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०.५१ टक्के समर्थकांनी महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे म्हटले आहे. तर पवारांच्या राजीनाम्यामळे महाविकास आघाडीवर ५८.८२ टक्के राष्ट्रवादीच्या समर्थकांनी परिणाम होणार नाही, असे सांगितले. तर २०.७५ टक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी काही सांगता येणार नाही, असे म्हटले आहे.

Sakal-Saam Survey on Sharad Pawar Resignation Decision
Big Decision of State Govt: राज्य सरकारचा निर्णय; रस्त्यांच्या विकासासाठी नव्या महामंडळाची स्थापना

सर्वेक्षणात सहभागी बहुतांश इतर लोक व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असे सांगितले आहे. त्यांची संख्या ६०.७ टक्के आहे. तर त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे मत २८.४ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तसेच १०.९ टक्के लोकांनी सांगता येणार नाही, असे उत्तर दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com